Home | Sports | From The Field | IPL: Rajasthan Royals win Bangalore out of IPL

IPL RR vs RCb : ​‘राॅयल’ विजयाने बंगळुरू बाहेर; राहुल त्रिपाठीचे अर्धशतक तर एबी डिव्हिलियर्सची झुंज व्यर्थ

वृत्तसंस्था | Update - May 20, 2018, 07:29 AM IST

युवा फलंदाज राहुल त्रिपाठी (नाबाद ८०) अाणि श्रेयस गाेपालच्या (४/१६) धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान राजस्थान संघाने घरच

 • IPL: Rajasthan Royals win Bangalore out of IPL

  जयपूर - युवा फलंदाज राहुल त्रिपाठी (नाबाद ८०) अाणि श्रेयस गाेपालच्या (४/१६) धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान राजस्थान संघाने घरच्या मैदानावर राॅयल विजयाची नाेंद केली. राजस्थानने अापल्या शेवटच्या संधीला सार्थकी लावताना विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.

  अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानने जयपूरच्या मैदानावर ३० धावांनी सामना जिंकला. या विजयाच्या बळावर राजस्थान संघाने गुणतालिकेत चाैथे स्थान गाठले. यासह अाता राजस्थानला प्ले अाॅफची संधी अाहे. मात्र, उर्वरित टीमच्या सरासरीवरच अाता राजस्थान संघाचे भवितव्य टिकून अाहे. दुसरीकडे पराभवामुळे काेहलीच्या बंगळुरू संघाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. अापल्या शेवटच्या सामन्यात काेहली सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे त्याचा प्ले अाॅफ प्रवेशाचा प्रयत्न अपुरा ठरला.


  राहुल त्रिपाठीच्या नाबाद अर्धशतकाच्या अाधारे राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने १९.२ षटकांत अवघ्या १३४ धावांत अापला गाशा गुंडाळला. श्रेयस गाेपाल, जयदेव उनाडकत, लाऊघलिन यांनी धारदार गाेलंदाजी करताना बंगळुरूचे कंबरडे माेडले. त्यामुळे बंगळुरूच्या कर्णधार काेहली (४), माेईन (१), मनदीप सिंगला (३) माेठी खेळी करता अाली नाही. दुसरीकडे डिव्हिलियर्स अाणि पार्थिवची झंुज अपयशी ठरली.

  सामनावीर गाेपाल
  राजस्थान संघाच्या विजयात माेलाचे याेगदान देणारा श्रेयस गाेपाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात धारदार गाेलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. यासह त्याने बंगळुरूला झटपट गुंडाळण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली. त्यामुळे बंगळुरूने गाशा गुंडाळला.

  एबी डिव्हिलियर्सची झुंज ठरली व्यर्थ
  बंगळुरू संघाचे अाव्हान कायम ठेवण्यासाठी डिव्हिलियर्सने एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. त्याने राजस्थानच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना ३५ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. यात ७ चाैकारांचा समावेश अाहे. त्याचे यंदाच्या सत्रातील हे पाचवे अर्धशतक ठरले. मात्र, त्यांची ही खेळी व्यर्थ ठरली. त्याने अर्धशतकी भागीदारीही रचली.

  राहुल त्रिपाठीचे अर्धशतक

  युवा फलंदाज राहुल त्रिपाठीने सामन्यात शानदार नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ५८ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि ३ षटकारांसह ८० धावा काढल्या.

  पुढील स्लाईडवर पहा धावफलक....

 • IPL: Rajasthan Royals win Bangalore out of IPL

Trending