Home | Sports | From The Field | IPL: Rayudu's unbeaten century by 62 balls

IPL: रायडूचे 62 चेंडूंत नाबाद शतक; चेन्नई सुपरकिंग्जचा दावा मजबूत; हैदराबादचा तिसरा पराभव

वृत्तसंस्था | Update - May 14, 2018, 12:44 AM IST

यजमान चेन्नई सुपरकिंग्जने धडाकेबाज विजयाच्या बळावर रविवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्ले अाॅफमधील प्रवे

 • IPL: Rayudu's unbeaten century by 62 balls

  पुणे - यजमान चेन्नई सुपरकिंग्जने धडाकेबाज विजयाच्या बळावर रविवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्ले अाॅफमधील प्रवेशाचा अापला दावा मजबूत केला. सामनावीर अंबाती रायडूच्या (१००) नाबाद शतकी खेळीच्या बळावर दाेन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने अापल्या १२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. चेन्नईने पुण्यातील घरच्या मैदानावर ८ गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नईने गुणतालिकेतील दुसरे स्थान मजबूत केले. चेन्नईचे अाता ८ विजयांसह १६ गुण झाले अाहेत. दुसरीकडे पाहुण्या हैदराबादचा लीगमधील हा तिसरा पराभव ठरला.


  शिखर धवन (७९) अाणि विलियम्सन (५१) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमाेर १८० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात यजमान चेन्नई संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १९ षटकांत विजयाचे लक्ष्य सहज गाठले.
  वाॅटसन-रायडूची विजयी भागीदारी : चेन्नईच्या विजयासाठी सलामीवीर शेन वाॅटसन (५७) अाणि अंबाती रायडूने शानदार शतकी भागीदारी रचली. त्याने पहिल्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी केली. यात शेन वाॅटसनने अर्धशतकाचे याेगदान दिले. तसेच कर्णधार धाेनीने नाबाद २० धावा काढून टीमचा विजय निश्चित केला.


  विलियम्सनचे विक्रमी सातवे अर्धशतक : हैदराबाद संघाचा फाॅर्मात असलेला कर्णधार विलियम्सनने लीगमध्ये सातव्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ५१ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादला माेठी धावसंख्या उभी करता अाली. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही.

  सामनावीर रायडू
  चेन्नईच्या सामनावीर अंबाती रायडूने रविवारी घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना प्रत्येकी ७ चाैकार अाणि षटकारांच्या अाधारे नाबाद १०० धावा काढल्या. त्याचे सत्रातील हे पहिलेच शतक ठरले.

  पुढील स्लाईडवर पहा सामन्याचे धावफलक....

 • IPL: Rayudu's unbeaten century by 62 balls
 • IPL: Rayudu's unbeaten century by 62 balls

Trending