Home | Sports | From The Field | Ireland's Ed. Joe has taken retirement from cricket

आयर्लंडच्या एड. जोएसने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था | Update - May 25, 2018, 03:24 AM IST

आयर्लंडचा दिग्गज क्रिकेटर गेल्या आठवड्यात आपल्या करिअरचा पहिला व एकमेव कसोटी सामना खेळणाऱ्या एड. जोएसने गुरुवारी आंतरराष

  • Ireland's Ed. Joe has taken retirement from cricket

    लंडन - आयर्लंडचा दिग्गज क्रिकेटर गेल्या आठवड्यात आपल्या करिअरचा पहिला व एकमेव कसोटी सामना खेळणाऱ्या एड. जोएसने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विशेष म्हणजे त्याने दोन देशांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.
    त्याने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून वनडेत पदार्पण केले होते आणि आयर्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून वनडे व कसोटी सामना खेळला आहे.

    जोएसला आयर्लंडचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटर म्हणून पाहिले जाते. आयर्लंड क्रिकेटने म्हटले की, ३९ वर्षीय जोएस आता फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. त्याच्या प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    त्यानंतर जोएसने आयर्लंड क्रिकेटचे आभार मानले. जोएसने म्हटले की, खेळणे सोडून नवा अध्याय सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. आयर्लंड क्रिकेटच्या प्रशिक्षण समितीमध्ये मला स्थान दिल्याने मी त्यांचा आभारी आहे. जोएसने आयर्लंडकडून ६१ वनडे आणि एकूण ७८ वनडे सामने खेळला आहे. त्याने ५ शतकांसह २६२२ धावा केल्या आहेत. त्याने आयर्लंडकडून सर्वाधिक क्रिकेट खेळले आहे.

Trending