आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचा मालिका विजय; जाेस बटरलचे अाॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध झंझावाती शतक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- माेर्गनच्या नेतृत्वाखाली पाहुण्या इंग्लंड संघाने रविवारी यजमान अाॅस्ट्रेलियावर मालिका विजय संपादन केला. इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या वनडेत अाॅस्ट्रेलियावर १६ धावांनी मात केली. यासह इंग्लंडला पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी अाघाडी मिळाली. यजमान अाॅस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर मालिकेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. यामुळे यजमानांना मालिका पराभवाच्या नामुष्कीला सामाेरे जावे लागले.   


जाेस बटलरच्या (१००) नाबाद झंझावाती शतकाच्या बळावर इंग्लंडने यजमान अाॅस्ट्रेलियासमाेर विजयासाठी ३०३ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलिया संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली.  

 
यासह इंग्लंडला १६ धावांनी शानदार विजयाची नाेंद करता अाली. मार्क वूड (२/४६), वाेक्स (२/५७) अाणि रशीद (२/५१) यांच्या धारदार गाेलंदाजीसमाेर अाॅस्ट्रेलियाच्या अव्वल फलंंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही. त्यामुळे यजमानांना पराभवाला सामाेरे जावे लागले. यामुळे इंग्लंडला मालिकेत विजयाची हॅट््ट्रिकही साधता  अाली.   


बटरलचे शतक; शेवटच्या पाच षटकांत सर्वाधिक षटकार
इंग्लंडच्या जाेस बटलरने तिसऱ्या वनडेत झंझावाती शतक ठाेकले. त्याने ८३ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि ४ उत्तंुग षटकारांच्या अाधारे नाबाद १०० धावांची खेळी केली. त्याने उत्तुंग षटकार ठाेकून करिअरमधील पाचवे शतक साजरे केले.  यासह ताे  वनडे क्रिकेटमध्ये २०१३ नंतर शेवटच्या पाच षटकांत (४६-५०) सर्वाधिक ३८ षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला. यामध्ये डिव्हिलियर्स अाता ३७ षटकारांसह दुसऱ्या स्थानी अाहे. त्याने हा पराक्रम २०१३ मध्ये केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...