आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेपालच्या दीड शतकाने कर्नाटकचा धावांचा डाेंगर; मुंबईची निराशा, सूर्यकुमारने सावरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- श्रेयस गाेपाल (१५०) अाणि अरविंद श्रीनाथच्या (नाबाद ५१) झंझावाती खेळीच्या बळावर कर्नाटकने रणजी ट्राॅफीमध्ये मुंबईविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात धावांचा डाेंगर रचला. कर्नाटकने पहिल्या डावात ५७० धावा काढल्या. प्रत्युत्तरात ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाची निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १२० धावा काढल्या. अद्याप २७७ धावांनी पिछाडीवर असलेल्या मुंबईकडे ७ विकेट शिल्लक अाहेत. सूर्यकुमार यादवने (५५) नाबाद अर्धशतकाच्या अाधारे टीमच्या धावसंख्येला गती दिली.  सध्या मैदानावर सूर्यकुमार यादव अाणि अक्षय पारकर (नाबाद ३) खेळत अाहेत. कर्नाटकच्या गाेवथामने धारदार गाेलंदाजी करताना सामन्यात दाेन विकेट घेतल्या.   


कर्नाटक संघाने कालच्या ६ बाद ३९५ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार विनय ३७ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.   


सूर्यकुमारची  झंुज : युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देताना पिछाडीवर पडलेल्या मुंबईचा डाव सावरला. त्याने ११५ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ५५ धावा काढल्या.

 

श्रेयस गाेपालचा झंझावात 
कर्नाटकच्या युवा फलंदाज श्रेयस गाेपालने झंझावाती खेळी केली. त्यामुळे त्याला अापल्या टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावत आला. त्याने २७४ चेंडूंत ११ चाैकारांच्या अाधारे १५० धावा काढल्या.  अरविंदने ४१ चेंडूंत ९ चाैकार व एका षटकाराच्या अाधारे नाबाद ४१ धावांची खेळी केली.   

बातम्या आणखी आहेत...