Home | Sports | From The Field | Kartik in the casket team for eight years! Rest in injured Saha

कार्तिक अाठ वर्षांनंतर कसाेटी संघात!; जखमी साहाला विश्रांती

वृत्तसंस्था | Update - Jun 03, 2018, 05:28 AM IST

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला तब्बल ८ वर्षांनंतर कसाेटीसाठी मैदानावर पुनरागमन करण्यासाठी संधी मिळाली अाहे. भारतीय क्

  • Kartik in the casket team for eight years! Rest in injured Saha

    नवी दिल्ली - यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला तब्बल ८ वर्षांनंतर कसाेटीसाठी मैदानावर पुनरागमन करण्यासाठी संधी मिळाली अाहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने त्याची नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसाेटी सामन्यासाठी यजमान संघात निवड केली. नुकत्याच झालेल्या ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे कार्तिकला भारतीय संघामध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्याने करिअरमधील शेवटचा कसाेटी सामना २०१० मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला हाेता. त्यानंतर अाता ताे कसाेटीसाठी मैदानावर उतरणार अाहे.


    येत्या १४ जूनपासून बंगळुरू येथे अफगाणिस्तान व टीम इंडिया यांच्यातील कसाेटीला सुरुवात हाेईल. हेच माझ्यासाठी माेठे धक्कादायक अाहे. अाता दिलेल्या संधीला सार्थकी लावण्यासाठी मी कसून मेहनत घेणार अाहे, अशी प्रतिक्रिया कार्तिकने दिली.

    कार्तिकला बर्थडेचे माेठे गिफ्ट
    यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शुक्रवारी, १ जून राेजी ३३ व्या वर्षात पदार्पण केले. या बर्थडे सेलिब्रेशननंतर त्याला बीसीसीअायकडून भारतीय संघाकडून कसाेटी सामन्यात खेळण्याच्या संधीचे माेठे गिफ्ट मिळाले.

Trending