सेंच्युरियन-विराट कोहलीने द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी १५३ धावांची खेळी केली. विराटने कारकीर्दीतील २१ वे शतक ठोकले. दक्षिण आफ्रिकेत शतक ठोकणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. याआधी सचिन तेंडुलकरने केपटाऊनमध्ये १६९ धावांची खेळी केली होती.
अाफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत भारताने पहिल्या डावात ३०७ धावा काढल्या. यादरम्यान अश्विनने ३८ धावांचे याेगदान दिले. दरम्यान, यजमान दक्षिण अाफ्रिकेने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर २ गड्यांच्या माेबदल्यात ९० धावा काढल्या. यामुळे अाफ्रिकेला ११८ धावांची अाघाडी घेता अाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने दाेन गडी बाद केले. त्यामुळे सलामीवीर मार्कराम अाणि हाशिम अामला झटपट बाद झाले. डिव्हिलियर्सने (५०) नाबाद अर्धशतक ठाेकले.
भारताने ५ बाद १८३ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुुरुवात केली. विराट काेहलीने अापली लय कायम ठेवताना टीम इंडियाच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान हार्दिक पांड्या १५ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, चाेरटी धाव घेताना ताे बाद झाला. या दाेघांनी सहाव्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली.
त्यानंतर अश्विनने मैदानावर संयमी खेळी केली. त्यामुळे त्याची काेहलीला माेलाची साथ मिळाली.
काेहली-अश्विनची अर्धशतकी भागीदारी
विराट काेहलीला अश्विनचे माेलाची साथ दिली. त्यामुळे त्याला अापली लय कायम ठेवता अाली. दरम्यान, या दाेघांनी सातव्या गड्यासाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अश्विनने ५४ चेंडूंत ३८ धावांचे याेगदान दिले.
सचिनला टाकले मागे जबरदस्त फाॅर्मात अालेल्या कर्णधार विराट काेहलीने वेगवान शतक ठाेकून सचिनला मागे टाकले. त्याने १०९ डावांत २१ वे शतक ठाेकले. सचिनच्या नावे ११० डावांत २१ व्या शतकाची नाेंद अाहे. कमी डावांत शतक ठाेकणारा काेहली हा चाैथा फलंदाज ठरला. गावसकरचे ९८ डावांत २१ वे शतक हाेते.
कर्णधाराच्या भूमिकेत सचिनशी बराेबरी
तिसऱ्या दिवशी काेहलीने शतक साजरे केले. यासह त्याने सचिनशी बराेबरी साधली. काेहलीचे कर्णधाराच्या भूमिकेत अाफ्रिकेत शतक ठाेकण्याचा पराक्रम गाजवला. यापूर्वी १९९७ मध्ये केपटाऊन कसाेटीत सचिनने १६९ धावांची खेळी केली हाेती.
सेंच्युरियनमध्ये दुसरा भारतीय शतकवीर
सेंच्युरियन येथील मैदानावर काेहलीने शतक ठाेकले. अशी कामगिरी करणारा काेहली हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सचिनने २०१० मध्ये येथे शतक साजरे केले हाेते.
बुमराहचे दाेन बळी
भारताकडून युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराह चमकला. त्याने दुसऱ्या डावात शानदार दाेन विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर मार्कराम अाणि हाशिम अामलाला बाद केले. त्यामुळे अाफ्रिकेला सुरुवातीलाच माेठे धक्के बसले.
पावसाचा व्यत्यय
दुसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाचे अागमन झाले. त्यामुळे दुसऱ्या डावात खेळणाऱ्या खेळ थांबवावा लागला. दरम्यान, पुन्हा सुरुवात झाली हाेती.
फास्टेस्ट 21 शतके करणारे फलंदाज
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) 56 इनिंग
सुनील गावस्कर (इंडिया) 98 इनिंग
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 105 इनिंग
विराट कोहली (इंडिया) 109 इनिंग
सचिन तेंडुलकर (इंडिया) 110 इनिंग
गेल्यावर्षी मोडला होता लाराचा विक्रम
- गेल्यावर्षी कोहलीने रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकरच्या 11 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
- त्याचबरोबर कर्णधार म्हणून 5 द्विशतकांचा ब्रायन लाराचा विक्रमही मोडला होता.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात केल्या 335 धावा
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावामध्ये 335 धावा केल्या. ए मार्करामने 94 धावांची खेळी खेळली. त्याशिवाय हाशिम आमला (82) आणि फाफ डुप्लेसिस (63) नेही अर्धशतक केले होते. भारताकडून अश्विनने 4 विकेट घेतल्या आणि इशांत शर्माने 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 307 धावा केल्या. कोहलीशिवाय मुरली विजय (46) आणि आर अश्विन (38) ने चांगली खेळी केली.
पुढे पाहा, सामन्याचे काही PHOTOS आणि धावफलक ..