आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता पोलिसांनी शमीचा फोन केला जप्त, BCCI कडून माहिती मागवली; पत्नी हसीनच्या तक्रारीनंतर कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीचा मोबाइल जप्त केला आहे. (फाइल) - Divya Marathi
कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीचा मोबाइल जप्त केला आहे. (फाइल)

कोलकाता - मोहम्मद शमीवर पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपानंतर आता पोलिस कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी क्रिकेटर शमीचा मोबाइल जप्त केला आहे. पोलिसांनी एक पत्र बीसीसीआयला लिहिले आणि त्याच्याबद्दल माहिती विचारली आहे. पोलिसांनी बीसीसीआयकडे विचारणा केली आहे की साऊथ आफ्रिका मालिकेदरम्यान शमी कुठे थांबलेले हातो. कोण-कोणत्या ठिकाणी तो गेला होता? शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसा आणि विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

 

बीसीसीआयची चुप्पी 
- शमी प्रकरणावर बीसीसीआयचे अजून तोंडावर बोट आहे. त्यांनी या प्रकरणात साधलेली चुप्पी अनेक प्रश्न उपस्थित करत असून त्यांचे मौन सध्या रहस्य बनले आहे. 
- बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आम्ही योग्यवेळी योग्य पाऊल उचलू. 

 

साऊथ आफ्रिका दोऱ्यात महिलेसोबत शरीरसंबंध
- हसीन जहाँच्या आरोपानुसार, शमीच्या मोबाइलमध्ये त्याने अनेक महिलांसोबत केलेली बातचीत आहे. त्यांच्यासोबत केलेली चॅटिंग डिटेल्स त्यामध्ये आहे. 
- हसीनचा दावा आहे की या वर्षाच्या सुरुवातीला याची सुरुवात झाली. साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असताना शमीने एका अफ्रिकन महिलेसोबत संबंध ठेवले होते. 
- शमीचे परस्त्रियांसोबत संबंध असल्याच्या आरोपासोबत हसीन जहाँने म्हटले होते की 'शमीने त्याच्या भावाला मला मारून मृतदेह जंगलात फेकण्यास सांगितला होता.'

बातम्या आणखी आहेत...