आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहितचे पहिले शतक, कुलदीपचा चाैकार, भारताचा मालिका विजय; सहावा वनडे शुक्रवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेर्ट एलिझाबेथ- राेहितचे (११५) झंझावाती शतक अाणि कुलदीप यादवच्या (४/५७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने मंगळवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेवर मालिका विजय संपादन केला. भारताने मालिकेतील पाचव्या वनडेत अाफ्रिकेवर ७३ धावांनी मात केली. यासह भारताने सहा वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये ४-१ ने विजयी अाघाडी घेतली. अाता मालिकेतील शेवटचा अाणि सहावा वनडे सामना शुक्रवारी हाेणार अाहे. 


राेहितच्या शतकाने भारताने प्रथम फलंदाजी करताना अाफ्रिकेसमाेर विजयासाठी २७५ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दक्षिण अाफ्रिकेने ४२.२ षटकांत अवघ्या २०१ धावांत अापला गाशा गुंडाळला. अाफ्रिकेकडून हाशिम अामलाने (७१) केेलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.  कुलदीप यादवपाठाेपाठ हार्दिक पांड्या (२/३०) अाणि यजुवेंद्र चहल (२/४३) यांनी धारदार गाेलंदाजी करून भारताच्या विजयामध्ये माेलाचे याेगदान दिले.


२६ वर्षांनंतर पहिला विजय : तब्बल २६ वर्षांपासूनची या मैदानावरची पराभवाची मालिका भारताने मंगळवारी खंडत केली. यासह भारताने  प्रथमच या मैदानावर विराट विजयाची नाेंद केली. या सामन्यात बाजी मारून भारतीय संघाला मालिका विजयाची नाेंद करता अाली.  भारताने सहा वनडे सामन्यांच्या या मालिकेमध्ये ४-१ ने अाघाडी घेतली अाहे.

 

राेहित शर्माचे अाफ्रिकेत पहिले शतक 
राेहितने अाफ्रिकेच्या मैदानावर शानदार पहिले शतक साजरे केले. त्याचे हे करिअरमधील १७ वे वनडे शतक ठरले.  त्याने १२६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार व ४ षटकारांच्या अाधारे ११५ धावांची खेळी केली.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, धावफलक आणि संबंधित PHOTOS

बातम्या आणखी आहेत...