आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ विजयी; तामिळनाडूची गुजरातवर मात; विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नादाऊन- कर्णधार राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या युवा संघाने साेमवार विजय हजारे ट्राॅफी वनडे क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुसरीकडे मुंबईनेही अापल्या गटात विजयाचे खाते उघडले. विदर्भाच्या युवांनीही सलामीला शानदार विजयाची नाेेंद केली. साेमवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. या शानदार विजयासह या संघांनी स्पर्धेतील अापल्या माेहिमेला अापापल्या गटातून  दमदार सुरुवात केली.  दुसरीकडे सलामीलाच मध्य प्रदेशसह झारखंड अाणि बंगालच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. सुमार खेळीमुळे या टीमच्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला.   


महाराष्ट्राचा बंगालवर ७ गड्यांनी विजय 
राहुल त्रिपाठीच्या (१२५) झंझावाती शतकाच्या बळावर महाराष्ट्राने ब गटात विजयाचे खाते उघडले. या टीमने गटातील अापल्या पहिल्या सामन्यात बंगालवर ७ गड्यांनी मात केली.   
प्रथम फलंदाजी करताना बंगालने ९ बाद २९३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने ३ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठलेे. महाराष्ट्राच्या विजयात अाैरंगाबादच्या गुणवंत अंकित बावणे (२२) अाणि जालन्याच्या विजय झाेलने (२४) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे महाराष्ट्राला ४५.५ षटकात विजयाची नाेंद करता अाली.  विजयात सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (७७) अर्धशतकी खेळी माेलाची ठरली. उस्मानाबादच्या नाैशाद शेखने नाबाद ३९ धावांची खेळी करताना महाराष्ट्राचा विजय निश्चित केला.  


राहुलचे झंझावाती शतक

युवा कर्णधार राहुल त्रिपाठीने साेमवारी झंझावाती शतकाच्या बळावर अापल्या टीमचा विजय निश्चित केला. त्याने १०२ चेंडूंचा सामना करताना १२ चाैकार अाणि ४ उत्तुंग षटकारांच्या अाधारे १२५ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने विजय झाेलसाेबत अर्धशतकी  भागीदारीही रचली.


मुंबई ७४ धावांनी विजय

मध्य प्रदेशचा पराभव : अादित्यच्या नेतृत्वात मुंबई संघाने क गटातील सलामीला मध्य प्रदेशचा पराभव केला. मुंबईने ७४ धावांनी सलामीचा सामना जिंकला. मुलानी (४/६२) अाणि मतकर (३/५०) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर मुंबर्इने सामन्यात मध्य प्रदेशचा धुव्वा उडवला.


सूर्यकुमार यादवच्या (१३४) शतकामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई टीमने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३३२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने ४६.१ षटकांत  २५८ धावांवर  गाशा गुंडाळला. त्रिपाठीने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली.  

 

ऋतुराज-विजयने रचला विजयाचा पाया 
धावांचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्र संघाला सलामीच्या ऋतुराज गायकवाड अाणि विजय झाेलने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. यासह त्यांनी टीमच्या विजयाचा मजबूत पाया रचला. दरम्यान, जालन्याच्या विजय झाेलने ४७ चेंडूंत दाेन चाैकारांच्या अाधारे २४ धावांची खेळी केली. दरम्यान, त्याला घाेषने झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  ऋतुराजने ७० चेंडूंमध्ये ७७ धावा काढल्या. यात ९ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत...