आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसाेटी- अाफ्रिकेचे वर्चस्व कायम; भारत पराभूत, अाफिकेची 1-0 ने मालिकेत अाघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- यजमान दक्षिण अाफ्रिकेने अापल्या घरच्या मैदानावर दबदबा कायम ठेवताना साेमवारी चाैथ्याच दिवशी सलामीच्या कसाेटीत टीम इंडियाला धूळ चारली. सामनावीर वेर्नाेन फिलेंडरच्या (६/४२) घातक गाेलंदाजीच्या बळावर अाफ्रिकेने भारतावर ७२ धावांनी शानदार विजय संपादन केला.विजयाच्या २०८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात अवघ्या १३५ धावांवर अापला गाशा गुंडाळला. अव्वल अाणि अनुभवी फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे भारताला माेठ्या फरकाने लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. अाफ्रिकेने पहिल्या डावात २८६ धावा काढताना दुसऱ्या डावात १३० धावांची खेळी केली हाेती. त्यानंतर पहिल्या डावात २०९ धावा काढणाऱ्या भारताला दुसऱ्या डावात १३५ धावांपर्यंत मजल मारता अाली.


या विजयासह अाफ्रिकेने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसऱ्या कसाेटीला १३ जानेवारीपासून सेंच्युरियन येथे सुरुवात हाेईल. भारतासाठी ही कसाेटी निर्णायक अाहे.


पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवशी रविवारी खेळ हाेऊ शकला नाही. त्यामुळे चाैथ्या दिवशी अाफ्रिकेने २ बाद ६५ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली हाेती. मात्र, यजमानांच्या अव्वल फलंदाजांनाही घरच्या मैदानावर समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे टीमला अापला दुसरा डाव अवघ्या १३० धावांत झटपट गुंडाळावा लागला. दमछाक झालेल्या अाफ्रिकेकडून डिव्हिलियर्सने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. सलामीवीर मार्करामने ३४, एल्गरने २५ व केशव महाराजने १५ धावांचे याेगदान दिले. इतर फलंदाज मात्र मैदानावर सपशेल अपयशी ठरलेत. 

 

सामनावीर वेर्नाेन फिलेंडरचे सहा बळी 
यजमान दक्षिण अाफ्रिकेचा गाेलंदाज वेर्नाेन फिलेंडर चाैथ्या दिवशीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने धारदार गाेलंदाजी केल्यामुळे अाफ्रिकेला झटपट विजयाची नाेंद करता अाली. त्याने दुसऱ्या डावात १५.४ षटकांत ४२ धावा देताना सहा गडी बाद केले. त्याने सलामीच्या मुरली विजयसह काेहली, राेहित शर्मा, अश्विन, माे. शमी अािण बुमराहला बाद केले. 

 

साहाने टाकले धाेनीला मागे
टीम इंडियाच्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सलामीच्या कसाेटीत अव्वल कामगिरी केली. त्याने एकाच कसाेटीत दहा झेलचा विक्रम रचला. यामध्ये त्याने माजी कर्णधार धाेनीच्या (९ झेल) कामगिरीला मागे टााकले. अाता अशी कामगिरी करणारा ताे पहिला यष्टिरक्षक अाहे.

 

जसप्रीत, शमी चमकले 
टीम इंडियाच्या युवा जसप्रीत बुमराह अाणि माे. शमीने धारदार गाेलंदाजी केली. त्यांनी अाफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्यामुळे अाफ्रिकेला अापला दुसरा डाव स्वस्तात गुंडाळावा लागला.

 

२०० धावा; १८ विकेट 
भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील सलामी कसाेटीच्या चाैथ्या दिवशी ६५ षटकांत २०० धावांसाठी एकूण १८ विकेट पडल्या. यात अाफ्रिकेच्या फिलेंडरने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक आणि फोटो ...

बातम्या आणखी आहेत...