आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Nine Hundred Plus Rating Points In Test And One Day; Virat Kohli Is Only Player Of India

काेहलीचे कसाेटी, वनडेत 900 प्लस रेटिंग गुण; भारताचा एकमेव फलंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अापल्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर सामन्यागणिक नवनव्या विक्रमाला गवसणी घालत अाहे. याशिवाय त्याने अापल्या नेतृत्वात भारतीय संघाची विजयी माेहीमही कायम ठेवली. याच उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर अाता त्याने अायसीसीच्या क्रमवारीमध्येही पराक्रम गाजवला. त्याने कसाेटीपाठाेपाठ अाता वनडेच्या क्रमवारीत एकसाेबत ९०० पेक्षा अधिक रेटिंग गुण संपादन केले. अशा प्रकारे दाेन्ही फाॅरमॅटमध्ये ९०० प्लस रेटिंग गुण संपादन करणारा काेहली हा भारताचा पहिला फलंदाज ठरला. तसेच काेहली हा जगातील दुसरा फलंदाज ठरला अाहे. यापूर्वी अशी कामगिरी दक्षिण अाफ्रिकेच्या डिव्हिलियर्सलाच करता अाली. त्यानंतर काेहलीने हा पराक्रम गाजवला.   


विराट काेहलीने यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सहा वनडे सामन्यांची मालिका गाजवली. त्याने यादरम्यान सहा सामन्यांमध्ये ५५८ धावा काढल्या. त्याच्या यजमान अााफ्रिकेविरुद्ध याच टीमच्या घरच्या मैदानावरील  या सर्वाधिक धावा ठरल्या. या झंझावाती फलंदाजीचा त्याला क्रमवारीत माेठा फायदा झाला. यातून त्याला ३३ गुणांची कमाई करता अाली. अाता ९०९ गुणांसह ताे  अव्वल स्थानावर अाहे. दुसरीकडे कसाेटी क्रमवारीत काेहली हा ९१२ गुणांसह  स्मिथपाठाेपाठ दुसऱ्या स्थानावर अाहे.  


बुमराह अाता वनडेत नंबर वन गाेलंदाज
भारताचा युवा जसप्रीत बुमराह अाता अायसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये नंबर वनचा गाेलंदाज झाला अाहे. त्याने संयुक्तपणे रशीद खानसाेबत हे स्थान संयुक्तपणे गाठले. या दाेघांचेही प्रत्येकी ७८७ गुण अाहेत. दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेमध्ये एकूण ३३ विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंनीही क्रमवारीत प्रगती साधली. यजुवेंद्र चहलने अाठवे अाणि कुलदीपने १५ वे स्थान गाठले.  

बातम्या आणखी आहेत...