आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Number Of Matches Increased; The Number Of Playing Days Up To 306 In The Period 2019 23

सामन्यांची संख्या वाढली; 2019-23 या कालावधीत खेळण्याच्या दिवसांची संख्या 306 पर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  सध्या फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाला जागतिक पातळीवर चमकण्यासाठी वेगळीच माेहीम हाती घेतली. यातून भारतीय संघाच्या कामगिरीची उंची वाढेल, असा बीसीसीअायला विश्वास अाहे. यासाठी नुकताच  बीसीसीआयने  अागामी २०१९ ते २०२३ या कालावधीचा कार्यक्रम निश्चित केला अाहे. यादरम्यान राष्ट्रीय टीमला सातत्याने मैदानावर अापले कसब दाखवावे लागेल. कारण बीसीसीआयने ३० अधिक सामन्यांचे आयोजन केले. मात्र, मंडळाने प्रत्यक्ष खेळण्याचे दिवस कमी केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे २०१५ ते २०१९ या कालावधीत भारतीय खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर ३९० दिवस खेळावे लागणार आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत खेळण्याच्या दिवसांची ही संख्या ३०६ पर्यंत खाली आणण्यात आल्याचा दावा बीसीसीआयने केला आहे. 


यादरम्यान सामन्यांची संख्या वाढवताना मंडळाने भारतीय क्रिकेटपटूंच्या अति क्रिकेट कुरबुरींकडे दुर्लक्ष केले अाहे.  या मोजदारीतून भारतात होणाऱ्या २०२१ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी व २०२३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळाव्या लागणाऱ्या सामन्यांची संख्या धरण्यात आली नाही. २०१५ ते २०१९ या कालावधीत ५१ सामनेच आयोजित करण्यात आले आहेत. या दाेन्ही स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळाली अाहे याचीही माहिती बीसीसीअायने अापल्या या बैठकीत दिली. दाेन वर्षांच्या फरकाने भारतात जागतिक पातळीवरच्या स्पर्धा अायाेजित करण्याची जबाबदारी बीसीसीअायवर पडणार अाहे. यासाठी अायाेजनाला सुरूवात हाेण्याची शक्यता अाहे.

 

तक्रारीकडे पाठ; कमाईला प्राधान्य 
क्रिकेटच्या कार्यक्रमाची आखणी करताना बीसीसीआयने खेळाडूंपेक्षाही प्रक्षेपण हक्काच्या प्रसारणाचे अधिक पैसे कसे मिळतील याकडे लक्ष दिले आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात बीसीसीआयचा स्टार स्पोर्ट््सबरोबरचा करार संपत आहे. त्यामुळे यातून अापल्या माेठ्या प्रमाणातल्या अार्थिक कमाईकडेच मंडळाने अधिक लक्ष घातलेे अाहे. कारण यातून मंडळाला माेठ्या संख्येत कमाई करता येईल.   

 

 

अफगाणिस्तानसाेबत कसाेटी खेळणार 
प्रमुख देशांच्या यादीत समावेश करण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने मान्य केला असून सामन्याचे ठिकाण व कालावधी नंतर उभय बोर्डांच्या वतीने संयुक्तपणे जाहीर करण्यात येणार आहे.

 

अटीवर राजस्थानची बंदी हटवणार

  राजस्थान  असोसिएशनवरील  बंदी दोन शर्थींसह उठवण्याचा निर्णय घेतला. यानुसार  असोसिएशनने  मंडळाविरुद्ध न्यायालयातील तक्रारी मागे घ्याव्यात व बंदी घातलेले  माजी अायुक्त ललित मोदी यांना संघटनेच्या कामकाजापासून दूर ठेवावे. 

 

नाडाचा प्रस्ताव फेटाळला; चाचणी नाकारली  

‘वाडा’  संघटनेशी करार केल्यामुळे ‘नाडा’ या भारतीय उत्तेजक द्रव्य चाचणी संघटनेने भारतीय क्रिकेटपटूंची चाचणी घेणे गरजेचे नाही, हा आपला पवित्रा बीसीसीआयने आजच्या विशेष सर्वसाधरण सभेतही कायम ठेवला.

 

पाकविरुद्ध क्रिकेटला रेड कार्ड

बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध मालिका किंवा सामन्यांचा समावेश आगामी कार्यक्रम पत्रिकेत केला नाही. त्याबाबत बीसीसीआयने स्पष्टीकरण देण्याचे टाळले. ‘कोची टस्कर’ फ्रँचायझीविरुद्धचा कायदेशीर लढा चालू ठेवण्याचा निर्णय बीसीसआयने घेतला.

बातम्या आणखी आहेत...