आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Only Twice Shikhar Dhawan Has Been Run Out In ODI, Both With Kohli On The Other End.

पहिल्या वनडेत विराट कोहलीने ठोकले शतक, तरीही सोशल मीडियातून उडतेय खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारताने डर्बनमध्ये दक्षिण अफ्रिकेविरोधात झालेल्या वनडे सीरीजमधील पहिली मॅच सहज खिशात घातली. या मॅचमध्ये भारताकडून विराट कोहलीने जबरदस्त बॅटिंग करताना शतक ठोकले व 112 धावांची धुव्वांधार इनिंग खेळली. ज्यामुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' निवडले गेले. मात्र, या सामन्यादरम्यान विराट अशी एक चूक केली ज्यामुळे फॅन्सने सोशल मीडियातून त्याला खूप ट्रोल केले. विराटने एक चुकीचा कॉल घेतल्याने शिखर धवनला धावबाद व्हावे लागले. फॅन्सने घेतली मजेशीर फिरकी....

 

- मॅच दरम्यान विराटने एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला ज्यात शिखर धवन (35) रन आउट झाला. वनडे करियरमध्ये दुस-यांदा तो रन आउट झाला. 
- आउट होताच धवनने पॅव्हेलियन परतताना आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर सोशल मीडियात फॅन्सने विराटला ट्रोल करणे सुरू केले.
- क्रिकेट फॅन्सने मजेदार कमेंट्स करत म्हटले की, ड्रेसिंग रूममध्ये विराट आणि धवन यांच्यात पुढील चांगलीच खेचाखेची होईल.
- एक यूजरने लिहले की, 'शिखर धवन गपचूप हॉटेलवर जाऊन झोपला. आता शिव्या तरी कोणाला घालायच्या आणि ऐकणार तरी कोण?'
- एक फॅनने कमेंट केली की, 'कोहलीने यामुळे शतक ठोकले कारण धवनचा राग शांत होईल तोपर्यंत तरी बॅटिंग करावी लागेल ना.'

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, फॅन्सच्या विराट कोहलीविरोधात कशी मजेशीर कमेंट्स केल्या....

बातम्या आणखी आहेत...