आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

82 लाख रु. न भरल्याने क्रिकेटपटूंना सुरक्षा नाही; बोर्डाने व्यवस्था करायला हवी : एसएसपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- भारतीय क्रिकेट संघ सोमवारी धर्मशाला येथून चंदिगडला दाखल झाला तेव्हा पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला. क्रिकेट बोर्डाने गेल्या सामन्याच्या दरम्यान घेतलेल्या सुरक्षेच्या बदल्यात ८२ लाख रुपये जमा केले नव्हते, असे कारण सांगण्यात आले. यामुळे पोलिसांची सुरक्षा भारतीय क्रिकेटपटूंना मिळू शकणार नाही. चंदिगड पोलिसांबरोबरच माेहाली पोलिसांनीही क्रिकेपटू चंदिगडमध्ये आहेत, तेथे पंजाब पोलिसांची सुरक्षा देता येत नाही, असे कारण सांगितले. त्यामुळे सायंकाळी एकही खेळाडू हॉटेलबाहेर पडला नाही. या क्रिकेटपटूंना हॉटेलचे सुरक्षा रक्षक सुरक्षा देत आहेत.   


चंदिगड पोलिसांनी सुरक्षा नाकारण्याची  घटना प्रथमच घडत आहे. यापूर्वी मोहालीमध्ये जेव्हा सामने खेळले गेले तेव्हा चंदिगड पोलिसांनी कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. मोहाली पोलिसांनीही त्यांना सहकार्य केले होते. परंतु या वेळी त्यांनीही सुरक्षा नाकारली. 

 
क्रिकेटपटूंना सुरक्षा नसल्याने पोलिसांनाही धास्ती

चंदिगड व पंजाब पोलिसांतील कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनाही भारतीय क्रिकेटपटूंच्या सुरक्षेची काळजी वाटते. त्यामुळे अधिकारी हॉटेलात जाऊन त्यांना कोणत्या भागातील पोलिसांनी सुरक्षा दिली आहे, याची वारंवार भेट देऊन चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारीच त्यांना पाठवत आहेत. 

 

बोर्डाने  व्यवस्था करायला हवी : एसएसपी  
वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे एसएसपी शशांक आनंद यांनी सांगितले, आम्ही प्रत्येक वेळी क्रिकेट संघाला सुरक्षा देतो. परंतु बीसीसीआयने इतक्या मोठ्या सामन्याची स्वत:  सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती.  

बातम्या आणखी आहेत...