आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी- सेंच्युरियन कसोटीत चार वेगवान गोलंदाजांसह उतरेल द. अाफ्रिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्न मॉर्कल - Divya Marathi
मोर्न मॉर्कल

केपटाऊन- पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभूत झालेल्या टीम इंडियाला सेंच्युरियनमध्येही दक्षिण अाफ्रिकेच्या आक्रमणाचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सनने म्हटले की, दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघ चार वेगवान गोलंदाजांसह उतरेल. सुपर स्पोर्ट््स पार्कच्या खेळपट्टीवरदेखील मोठ्या प्रमाणात गवत असेल. दुसऱ्या कसोटीला शनिवारी सुरुवात होईल.  


संघात कोणताही बदल होणार नाही. मी नेहमीच वेगवान गोलंदाजांना संधी देतो, आम्ही यापुढेही चार गोलंदाजांसह उतरणार आहोत. केपटाऊनमध्ये दक्षिण अाफ्रिकेने आपले सर्वात मजबूत वेगवान गोलंदाज डेल स्टेन, वर्नोन फिलेंडर, मोर्न मॉर्कल आणि कॅगिसो रबाडा यांना उतरवले होते. स्टेनला सामन्यात दुखापत झाल्याने तो बाहेर झाला होता. तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी डुआने ओलिवियर व लुंगी एनगिदी संघाचे सदस्य होऊ शकतात. दक्षिण अाफ्रिका ३ कसोटींच्या मालिकेत १-० ने पुढे आहे. सेंच्युरियनमध्ये ते सिरीजवर कब्जा करण्यासाठी उतरतील. भारतासाठी हा ‘करा किंवा मरा’चा सामना असेल.
वेग व उसळी जास्त, स्विंग कमी सेंच्युरियनमध्ये केपटाऊनच्या तुलनेत खेळपट्टीवर वेग व उसळी जास्त असेल. स्विंग कमी प्रमाणात होईल.

 

गेल्या पाच वर्षांतील सेंच्युरियनमधील धावसंख्या

> अधिक पहिला डाव ५५२/५, दुसरा डाव ३४३, तिसरा डाव २९०/४,  चौथा डाव २००.  
> कमी पहिला डाव ३९८, दुसरा डाव १५६, तिसरा डाव १३१, चौथा डाव १०१.  

 

धवन, रोहितच्या निवडीवर सौरव गांगुलीचे प्रश्नचिन्ह

माजी कर्णधार सौरभ गांगुलीने पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर शिखर धवन व रोहित शर्माला स्थान देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विदेशी खेळपट्टीवर त्यांचा इतिहास चांगला नाही. ते अपयशी ठरल्यावर मुरली विजय व विराट कोहलीवर जास्त निर्भर राहावे लागले. त्याने चेतेश्वर पुजारावरही टीका केली. फॉर्म नाही, तर कोणी कोठे जास्त धावा केल्या हे महत्त्वाचे आहे.  लाेकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेला संधी दिली पाहिजे, असे गांगुलीने म्हटले.

 

> २२ कसोटी सामने खेळले सेंच्युरियनमध्ये दक्षिण अाफ्रिकेच्या संघाने. १७ विजय, दोन पराभव आणि ३ सामने बरोबरीत राहिले.  
> ०१ सामना खेळला आहे भारतीय संघाने सेंच्युरियनमध्ये आतापर्यंत. डावाच्या अंतराने भारताचा पराभव.  
> १८ विकेट रबाडाने सेंच्युरियनमध्ये २ कसोटींत घेतल्या. मॉर्कलने ७ मध्ये २८, फिलेंडरने ५ मध्ये २२ विकेट घेतल्या.

 

राहणे, राहुल, पार्थिव, ईशांतचा जोरदार सराव
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया नेट प्रॅक्टिसमध्ये अधिक वेळ घाम गाळत आहे. यात अजिंक्य राहणे, लोकेश राहुल, पार्थिव पटेल, ईशांत शर्मा हे  जोरदार सराव करत आहेत. दुसऱ्या कसोटीत शिखर धवनच्या जागी लोकेश राहुल सलामीला येऊ शकतो. मधल्या फळीत रोहित शर्माऐवजी अजिंक्य रहाणेचा संघात समावेश होईल.

बातम्या आणखी आहेत...