Home | Sports | From The Field | Shikhar Dhawan's record century; Murali Vijay, Lakeshahr's hurricane

शिखर धवनचे सलामीला विक्रमी शतक; मुरली विजय, लाेकेश राहुलचा झंझावात

वृत्तसंस्था | Update - Jun 15, 2018, 01:03 AM IST

सलामीवीर शिखर धवनच्या (१०७) विक्रमी शतकापाठाेपाठ मुरल विजय (१०५) अाणि लाेकेश राहुलने (५४) शानदार शतकी भागीदारी रचली. या

 • Shikhar Dhawan's record century; Murali Vijay, Lakeshahr's hurricane
  शतकी भागीदारीदरम्यान टीम इंडियाचा शिखर धवन अाणि मुरली विजय.

  बंगळुरू - सलामीवीर शिखर धवनच्या (१०७) विक्रमी शतकापाठाेपाठ मुरल विजय (१०५) अाणि लाेकेश राहुलने (५४) शानदार शतकी भागीदारी रचली. या शानदार खेळीच्या बळावर यजमान भारतीय संघाने गुरुवारी पाहुण्या अफगाणिस्तानविरुद्ध कसाेटीत दमदार सुरुवात केली. भारताने पहिल्या डावात दिवसअखेर ६ बाद ३४७ धावा काढल्या. यासह अफगाणिस्तान संघाने अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पण केले. अफगाणिस्तानकडून यामीन अहमदझाईने दमदार पदार्पण करताना दाेन विकेट घेतल्या. तसेच रशीद खान, वफादार, मुजीब रहमान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


  यजमान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार अजिंक्य रहाणेने घेतलेला हा निर्णय शिखर धवन अाणि मुरली विजय या सलामीच्या जाेडीने सार्थकी लावली. या दाेघांनी १६८ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, दाेघांनीही वैयक्तिक शतके साजरे केली. मुरलीने १५३ चेंडूंत १५ चाैकार व एका षटकारासह १०५ धावा काढल्या.

  पहिल्या सत्रातील सहावा शतकवीर
  शिखर धवनने पहिल्या डावाच्या पहिल्याच सत्रात शतक साजरे करून व्रिकमाला गवसणी घातली. त्याने पहिल्या सत्रात १०४ धावांची खेळी केली. त्याने ९६ चेंडूंत १९ चाैकार व ३ षटकारांसह १०७ धावा काढल्या. यासह ताे पहिल्याच सत्रात शतक करणारा जगात सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी, अाॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रम्पर, चार्ली मॅकार्टनी, डाॅन ब्रॅडमॅन, डेव्हिड वाॅर्नर व पाकच्या माजिदने हा असा पराक्रम गाजवला.

  पावसाचा व्यत्यय
  बंगळुरू कसाेटीदरम्यान पहिल्या दिवशी गुरुवारी पावसाचा व्यत्यय अाला. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात अाला. यादरम्यान यजमान भारतीय संघ १ बाद २४८ धावांवर खेळत हाेता. मुरली विजय अाणि लाेकेश राहुल हे दाेघे मैदानावर हाेते.

  पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक...

 • Shikhar Dhawan's record century; Murali Vijay, Lakeshahr's hurricane

Trending