आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाफ्रिकेवर भारताचा 7 धावांनी राेमहर्षक विजय;टी-२० सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- भारताच्या महिला अाणि पुरुष संघांनी अापल्या सरस खेळीच्या बळावर एकाच दिवशी यजमान दक्षिण अाफ्रिकेवर सलग दुसऱ्या मालिका विजयाची नाेंद केली. भारताच्या दाेन्ही संघांनी शनिवारी यजमान अाफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. यापूर्वी, वनडे मालिकाही भारताच्या संघांनी जिंकली हाेती. 


हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी पाचव्या शेवटच्या टी-२० सामन्यात अाफ्रिकेवर ५४ धावांनी मात केली. 


राेहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने तिसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यामध्ये अाफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. भारताने सलामी सामना जिंकून अाघाडी घेतली हाेती. मात्र, दुसऱ्या सामन्यात बाजी मारून अाफ्रिकेने बराेबरी साधली हाेती. 


भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अाफ्रिका संघाला ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १६५ धावांपर्यंत मजल मारता अाली. अाफ्रिकेकडून कर्णधार ड्युमिनीने (५५) अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. 


भारताकडून शिखर धवन (४७) अाणि सुरेश रैनाने (४३) एकाकी झुंज देताना टीमच्या धावसंख्येला गती दिली. राेहितने ११ अाणि हार्दिक पांड्याने २१ धावांचे याेगदान दिले.  
कर्णधार ड्युमिनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ज्युनियर डालाने सार्थकी लावला. त्याने सलामीच्या राेहितला बाद केले. यासह त्याने टीमला पहिला बळी मिळवून दिला. सुरेश रैनाने डाव सावरला. त्याने धवनसाेबत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...