आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीअरगर्लशी या स्टार क्रिकेटपटूने केला आहे विवाह, मैदानात पाहताच पडला होता प्रेमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍पोर्ट डेस्‍क- सध्‍या चालू असलेल्या भारत आणि साऊथ आफ्रिकेच्‍या टेस्‍ट सिरीजमध्‍ये आफ्रीकेच्‍या क्विंडन डिकॉकने पहिल्‍या इनिंगमध्‍ये 43 धावांची महत्‍त्‍वपूर्ण खेळी केली. साऊथ आफ्रिकेचा या यंग क्रिकेटपटू लाईमलाईटपासून दूर राहणेच पसंत करतो. त्‍याच्‍या मोजक्‍याच फॅन्‍सना माहित असेल की, त्‍याचा विवाह चीअरगर्लशी झालेला आहे. त्‍याच्‍या पत्‍नीचे नाव साशा आहे.


मैदानात पाहताच पडला होता प्रेमात
- 2012च्‍या चॅम्पियन्‍स लीग टी-20मध्‍ये डिकॉकने एका सामन्‍यात 51 धावांची खेळी केली होती. या सामन्‍यात 2 षटकार आणि 6 चौकार लगावून त्‍याने संघाला विजय मिळवून दिला होता. हा रोमांचक सामना लॉयन्‍स आणि मुंबई इंडियन्‍स टीमच्‍या दरम्‍यान होता.
- या सामन्‍यात साशा हर्ले चीअरलिडर होती. डिकॉकची शानदार खेळी पाहून ती फार इंप्रेस झाली व त्‍याला शुभेच्‍छा देण्‍यासाठी मैदानात गेली होती. तिला पाहताच डिकॉक तिच्‍या प्रेमात पडला होता.
- याविषयी डिकॉकने एका मुलाखतीत सांगितले आहे की, 'साशाला फिल्‍डवर प्रथम पाहिले तेव्‍हा पाहतच राहिलो. तिने माझे अभिनंदन केले होते. त्‍याचे उत्‍तर काही वेळाने मी तिला फेसबूकवर दिले. येथूनच आमच्‍यामध्‍ये बोलणे सुरु झाले. तेव्‍हापासून आम्‍ही एकमेकांना डेट करत आहोत. सप्‍टेंबर, 2016मध्‍ये आम्‍ही विवाह केला.'

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, क्विंटन डिकॉक आणि साशाचे पर्सनल फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...