आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्टस डेस्क- सध्या व्हॅलेंटाईन वीक साजरा होत आहे. भारताचा माजी सलामीवीर व स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे. यानिमित्त आम्ही सेहवाग-आरतीच्या लव्हस्टोरीबाबत सांगणार आहोत. सेहवागची पत्नी आरती दिल्लीतील प्रसिद्ध वकिल सूरज सिंग अहलावत यांची मुलगी आहे. 17 वर्षाची मैत्रीला प्रेमात बदलायला 14 वर्षे लागली. कारण या दोघांचे एकच गोत्र असल्याने या लग्नासाठी सेहवागसह आरतीची फॅमिली तयार नव्हती. त्यामुळेच कधी स्फोटक फलंदाज राहिलेल्या वीरेंद्र सेहवागची लव्ह लाईफ तशी खूपच स्लो राहिली होती. सेहवाग आणि आरतीचे कुटुंबिय आहेत नातेवाईक...
- आरतीच्या मोठी बहिणीने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, हे लग्न (वीरेंद्र-आरती) फॅमिलीत झाले आहे. हे लव्ह मॅरेज आहे.
- आमची अत्या (वडिलांची बहिण) लग्न सेहवागच्या फॅमिलीत कजिनसमवेत झाले होते.
- या लग्नात वीरेंद्र आणि आमच्या अत्यात दीर- वहिनीचे नाते झाले आहे.
- या लग्नावेळी वीरेंद्रचे वय 7 वर्षे तर आरतीचे 5 वर्ष होते.
गमतीच्या स्टाईलमध्ये केले होते प्रपोज-
- वीरू आणि आरती साधारणपणे रोजच एकमेकांशी बोलायचे, मात्र या दोघांनी कधीच असलेले प्रेम व्यक्त केले नव्हते.
- मे, 2002 मध्ये एकदा सेहवागने आरतीला गमतीत प्रपोझ केले. मात्र ही वेगळी गोष्ट आहे की, तिने या प्रपोजला खरे समजून लगेच होकार दिला. हा खुलासा खुद्द वीरेंद्र सेहवागने केला आहे.
आधी तयार नव्हेत कुटुंबिय-
- सेहवागने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘नॉर्मली आमच्या नातेवाईकांत जवळच्या नात्यात लग्न होत नाही.’
- ‘आमच्या लग्नासाठी आम्हा दोघांचे पालक तयार नव्हते. काही काळानंतर ते लग्नाला तयार झाले.'
- ‘आमच्या लग्नाला परवानगी देणे त्याच्यासाठी खूपच कठिण बाब होती.’
- आरतीच्या माहितीनुसार, ‘ दोन्ही फॅमिलीतील असे अनेक लोक होते ज्यांना हे लग्न पसंत नव्हते.
- मात्र, वीरेंद्रला हे लग्न करायचेच होते. अखेर आमच्या दोघांच्या समोर फॅमिलीतील लोकांना झुकावे लागले.
टेडी बियर होते पहिले गिफ्ट-
- क्रिकेटमधील सर्वात स्फोटक बॅट्समन समजल्या जाणार्या वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीला पहिले गिफ्ट टेडी बियर दिले होते.
- आरतीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, "सेहवागने हे गिफ्ट लग्नाआधी दिले होते. ते टेडी बियर फार क्यूट होते.
अनेक वर्षे मैत्री, 3 वर्षाचे अफेयर-
- 14 वर्षाच्या मैत्रीनंतर मे, 2002 मध्ये सेहवागने आरतीला चेष्टेने प्रपोज केले होते.
- तर, आरतीने याला हे प्रपोज खरं मानलं व तिने तत्काळ होकार दिला.
- आरतीच्या होकारानंतरही विरूने लग्न करायला 3 वर्षे लावली. एप्रिल, 2004 मध्ये दोघांचा विवाह झाला आहे.
- दिल्लीमध्ये झालेला हा विवाह एक हाय-प्रोफाइल विवाह होता. या लग्नाला अरुण जेटलीही आले होते. - वीरू-आरतीला आर्यवीर (2007) आणि वेदांत (2010) अशी दोन मुलेही आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, किती स्टायलिश आहे आरती सेहवाग.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.