आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 मालिका : मितालीचे अर्धशतक, भारतीय संघ विजयी; अाफ्रिकेवर 7 गड्यांनी मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेटचेफस्ट्राेरूम- वनडे मालिका विजयाने फाॅर्मात असलेल्या भारतीय महिलांनी मंगळवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध अाता टी-२० मालिका जिंकण्याच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. कर्णधार मिताली राजच्या (५४) नेतृत्वाखाली  भारतीय महिलांनी सलामीच्या सामन्यात अाफ्रिकेवर मात केली. भारताने १८.५ षटकांत ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारतीय महिला टीमने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने विजयी अाघाडी घेतली. गत अाठवड्यात भारतीय महिलांनी २-१ ने वनडे मालिका जिंकली अाहे.   


दक्षिण अाफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारतीय महिलांनी ७ चेंडू अाणि सात विकेट राखून दणदणीत विजयाची नाेंद केली. भारताच्या विजयामध्ये मुंबईच्या जेमीमा राॅड्रिग्जने ३७ धावांचे महत्त्वाचे याेगदान दिले. तसेच वेदानेही नाबाद ३७ धावांची खेळी करून टीमचा विजय निश्चित केला.भारतीय टीमला सलामीवीर मिताली व स्मृतीने  ४७ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. 

 

मुंबईच्या जेमिमाची मितालीसाेबत भागीदारी 
मुंबईच्या युवा फलंदाज जेमिमाची सलामीच्या सामन्यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. तिने टीमची कर्णधार मिताली राजसाेबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमच्या विजयाचा मार्ग सुकर केला.   जेमिमाने २७ चेंडूंत ४ चाैकार व  षटकारासह ३७ धावांची खेळी केली.

 

मिताली-वेदाने खेचली विजयश्री 

कर्णधार मिताली राज अाणि वेदा कृष्णमूर्तीने अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारतासाठी विजश्री खेचून अाणली.  त्यांनी ५२ धावांची भागीदारी केली.  यात मितालीने वैयक्तिक अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. तिने ४८ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावा काढल्या. यात ६ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. तसेच वेदाने २२ चेंडूंमध्ये प्रत्येकी ३ चाैकार व षटकार ठाेकून नाबाद ३७ धावा काढल्या.

 

हे ही महत्त्वाचे

> ०७ गड्यांनी विजयी  
> १८.५ षटकांत सामना जिंकला 

> ५४ नाबाद धावा मितालीच्या  
> ३७ धावांचे जेमिमाचे याेगदान  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...