आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20मालिका: मितालीचा झंझावात; द. अाफ्रिकेवर विजय; स्मृतीची 57 धावांची खेळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईस्ट लंडन- मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी  शुक्रवारी टी-२० मध्ये यजमान दक्षिण अाफ्रिकेवर सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली.  मितालीच्या (७६) नाबाद झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने  टी-२०  सामन्यात अाफ्रिकेवर ९ गड्यांनी मात केली. यास भारतीय महिलांनी पाच  टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ने  अाघाडी मिळाली.  आफ्रिकन महिलांचा हा  दुसरा पराभव ठरला. 


महाराष्ट्राची युवा गाेलंदाज अनुजा पाटील (२/३७) अाणि पूनम यादव (२/१८) यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अाफ्रिकेला ७ बाद १४२ धावांवर राेखले. प्रत्युत्तरात स्मृती अाणि मितालीने शतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाला १९.१ षटकांत ९ गड्यांनी विजय मिळवून दिला. संघाच्या विजयात हरमनप्रीत काैरने नाबाद ७ धावांचे याेगदान दिले. स्मृतीचे अर्धशतक : महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृती मानधनाने झंझावाती खेळी करताना वैयक्तिक अर्धशतक साजरे केले. तिने ४२ चेंडूंत४ चाैकार अाणि ३  षटकारांच्या अाधारे ५७ धावांची खेळी केली. 
मितालीच्या नाबाद ७६ धावा :  मिताली राजने नाबाद ७६ धावांची खेळी केली. तिने ६१ चेंडूंमध्ये ७६ धावा काढल्या. यात ८ चाैकारांचा समावेश अाहे. तिने स्मृतीसाेबत शतकी भागीदारी रचून विजय निश्चित केला.

बातम्या आणखी आहेत...