आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Australia Balcony Applauds As Mitchell Marsh Scores His Second Test Ton

मॅचमध्ये झाली अशी मजेदार घटना; फलंदाज नाचत होता, कॅप्टनने पकडले डोके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सध्या सिडनीत अॅशेज सीरीजचा 5वा आणि शेवटची टेस्ट खेळली जात आहे. मॅचमध्ये खेळाच्या 4थ्या दिवशी एक अशी मजेदार घटना झाली जी पाहून सर्व पोट धरून हसत राहिले. यादरम्यान, मिशेल मार्शने टेस्ट करिअरचे दुसरे शतक लगावत असे काही केले की कॅप्टन स्टीव्ह स्मिथने आपले डोकेच पकडले. 

 

असा झाला फनी इंसीडेंट...
- मॅचच्या चौथ्या दिवशी ही मजेशीर घटना 173.2 ओव्हरमध्ये झाली. 98 धावांवर खेळणाऱ्या मिशेल मार्शने टॉम करनच्या चेंडूवर पॉइंटकडे शॉट मारला आणि धाव घेण्यासाठी निघाला.
- मिशेलने वेगाने एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्यासाठी पळाला. तथापि, दुसरी धाव पूर्ण करण्याच्या आधीच तो एवढा खुश झाला की, जेव्हा वाटेत त्याला मोठा भाऊ शॉन त्याला भेटला तेव्हा तो शतक झाल्याचा आनंद व्यक्त करू लागला, पण तेव्हा त्याच्या 99च धावा झाल्या होत्या.
- ड्रेसिंग रूममध्ये उभ्या असलेला कॅप्टन स्टीव स्मिथ हे सर्व पाहत होता, आधी तर त्याने टाळी वाजवून मिशेलला चिअर केले, परंतु  जेव्हा त्याचे लक्ष गेले की दुसरी धाव पूर्ण करण्याआधीच तो शतकाचा आनंद व्यक्त करत आहे, तेव्हा त्याने जोराने ओरडून मिशेलला लक्षात आणून दिले की, तुला अजून धाव पूर्ण करायची आहे. 
- यानंतर मिशेलने वेगाने धावत दुसरी धाव पूर्ण केली. यादरम्यान कॅप्टन स्टीव्ह स्मिथने घाबरतच दोन्ही हातांनी आपले डोके पकडले होते, परंतु धाव पूर्ण झाल्यानंतर मार्श बंधूही आपल्या या मूर्खपणावर हसत राहिले.
- शतक पूर्ण केल्यानंतर एक धाव करून मिशेल मार्श बाद झाला. दुसरीकडे त्याचा मोठा भाऊ शॉन मार्श 156 धावा करून बाद झाला.

मॅच समरीः (चौथ्या दिवशी स्टम्प्सपर्यंत)

इंग्लंड- 346 आणि 93/4 (46 ओव्हर)
ऑस्ट्रेलिया- 649/7d (उस्मान ख्वाजा- 171, शॉन मार्श-156, मिशेल मार्श- 101)

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या फनी इंसीडेंटचे फोटोज......

बातम्या आणखी आहेत...