आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला टीम विजयासाठी सज्ज; दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध पाचवा टी-20 सामना अाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ अाता अाफ्रिकेविरुद्ध   एेतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर अाहे. शनिवारी भारत अाणि यजमान दक्षिण अाफ्रिकन संघामध्ये पाचवा अाणि शेवटचा टी-२० सामना रंगणार अाहे. हा सामना जिंकल्याने भारतीय महिलांना मालिका विजयाची नाेंद करता येईल. भारताने सलग दाेन विजयासह मालिकेमध्ये २-१ ने अाघाडी घेतली अाहे. पावसामुळे मालिकेतील चाैथा सामना रद्द झाला हाेता. सलगच्या दाेन पराभवानंतर अाफ्रिकेने तिसरा सामना जिंकला हाेता.   

 

अाता मालिकेतील पाचव्या  सामन्यातील विजयासाठी दाेन्ही संघ प्रयत्नशील राहतील. या सामन्यातील विजयाने भारताच्या नावे मालिकेची नाेंद हाेईल. दुसरीकडे हा सामना जिंकून यजमान अाफ्रिकेला मालिकेमध्ये बराेबरी साधता येईल.   


मिताली,स्मृती फाॅर्मात 
महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृती मंधाना सध्या फाॅर्मात अाहे. याशिवाय मिताली राजही उल्लेखनीय कामगिरी करत अाहे. त्यामुळे महिला टीमच्या विजयाची मदार या दाेन्ही अव्वल फलंदाजांवर असेल. स्मृतीने या टी-२० मालिकेत शानदार अर्धशतक झळकावले. यासह तिने संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

 

भारतीय महिलांना विक्रमाची संधी 
अाफ्रिका दाैऱ्यामध्ये सलग दाेन मालिका विजय संपादन करून भारतीय महिलांना विक्रमाची नाेंद करता येईल. एकाच टीमविरुद्ध सलग दाेन मालिका जिंकणारा भारत एकमेव संघ ठरेल.  भारतीय महिलांनी गत महिन्यात सलग विजयाची माेहीम अबाधित ठेवताना अाफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली. त्यापाठाेपाठ अाता टी-२० मालिका जिंकण्यासाठी भारताचा महिला संघ उत्सुक अाहे.

बातम्या आणखी आहेत...