आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानची कसून तयारी; अजिंक्य रहाणेकडून पदार्पणासाठी शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - बांगलादेशविरुद्ध मालिका विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला अफगाणिस्तानचा संघ अाता जबरदस्त फाॅर्मात अाहे. हीच लय कायम ठेवण्याच्या इराद्याने अाता अफगाणिस्तान संघ अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पणासाठी सज्ज अाहे. या दमदार पदार्पणासाठी अफगाणिस्तानच्या युवांनी कसून सराव केला. कर्णधार असगरच्या नेतृत्वाखाली हा संघ  दाेन दिवसांपासून नेटवर तयारी करत अाहे. अांतरराष्ट्रीय स्तरावर १२ वा कसाेटी संघ म्हणून अाता अफगाणिस्तानची नाेंद हाेणार अाहे. यासाठी टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेेने अफगाणिस्तान संघाला पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या. 


येत्या गुरुवारपासून बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी मैदानावर यजमान भारत अाणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसाेटी सामन्याला सुरुवात हाेईल. याच सामन्यातून अफगाणिस्तानला कसाेटी करिअरला सुरुवात करण्याची संधी अाहे. यासाठी अफगाणिस्तानचे युवा खेळाडू उत्सुक अाहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात यजमान काैशल्य पणास लावणार अाहे.

 

नवदीपकडून अाशा 
टीम इंडियाचा वेगवान गाेलंदाज  माे. शमी हा एनसीएच्या फिटनेस चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध कसाेटीत खेळता येणार नाही. त्याच्या जागी युवा गाेलंदाज नवदीप सैनीची निवड करण्यात अाली. त्याने  रणजीत चमकदार कामगिरी केली. यात त्याच्या नावे ८ सामन्यांत ३४ बळीची नाेंद अाहे.

बातम्या आणखी आहेत...