आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद/चेन्नई- फैज फझलच्या नेतृत्वाखाली रणजी चॅम्पियन विदर्भ संघाने अापली लय कायम ठेवताना गुरुवारी विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिक नाेंदवली. दुसरीकडे मुंबई संघानेही या स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर या दाेन्ही संघांनी अापापल्या गटाच्या गुणतालिकेत अव्वलस्थानावर धडक मारली. विदर्भाचा ड गटात हा सलग तिसरा विजय ठरला. तसेच मुंबईने क गटातील अापला तिसरा सामना जिंकला.
िवदर्भाची हैदराबादवर २३७ धावांनी मात
विदर्भ संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात हैदराबादवर मात केली. विदर्भाने ३४.२ षटकांत २३७ धावांनी मात केली. कर्णधार फैज फझल (१०३), जांगिड (८१) अाणि अपूर्व वानखेडेच्या (६६) झंझावाताच्या बळावर विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमाेर ३५१ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने अवघ्या ११३ धावांत अापला गाशा गुंडाळला. टीमकडून सुमंथने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
श्रीकांत, कर्णने उडवली दाणादाण
विदर्भाच्या कर्ण शर्मा (३/३८) व श्रीकांत वाघने (२/२०) हैदराबाद संघाची दाणादाण उडाली. त्यांनी हैदराबादचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. कर्ण शर्माने ३ बळी घेतले. श्रीकांतने दाेन गडी बाद केले. उमेश यादव, ठाकूर, कर्णेवार व संजयने प्रत्येकी एक गडी बाद केला.
मुंबई दाेन गड्यांनी विजयी
शुभम रांजणेच्या (५९) अर्धशतकाच्या बळावर मुंबई संघाने गटातील तिसरा सामना जिंकला. मुंबईने तामिळनाडूवर २ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडू संघाने १८३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबईने ४८.५ षटकांत अाठ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. विजयात सूर्यकुमारने २१, दुबेने २८ व अादित्यने १७ धावांचे याेगदान दिले.
महाराष्ट्राला हॅट््ट्रिकची संधी; अाज दिल्लीविरुद्ध झुंजणार
राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवण्याची महाराष्ट्र संघाला शुक्रवारी संधी अाहे. महाराष्ट्रासमाेर ब गटातील तिसऱ्या सामन्यात िदल्लीचे अाव्हान असेल. धर्मशालेच्या मैदानावर हे दाेन्ही संघ झुंजणार अाहेत. महाराष्ट्राने सलग दाेन विजयासह गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.