आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला एशिया कप T-२० क्रिकेट : मिताली राजच्या दोन हजार धावा पूर्ण केल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर -  भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय क्रिकेटर बनली आहे. त्याचबरोबर हे यश मिळवणारी ती जगातील एकमात्र महिला क्रिकेटरदेखील बनली आहे. तिने महिला आशिया कप टी-२० स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ही कामगिरी केली. आता तिच्या २०१५ धावा झाल्या आहेत.

 

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तिच्यापुढे केवळ दोनच पुरुष क्रिकेटर आहेत. यात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल (२२७१) आणि ब्रेंडन मॅक्युलम (२१४०) हे फलंदाज आहेत. विराट कोहलीदेखील आतापर्यंत टी-२० मध्ये दोन हजार धावा करू शकलेला नाही. कोहलीच्या नावावर १९८३ धावा आहेत. दोन हजारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ १७ धावांची गरज आहे. 


भारताने श्रीलंकेला ७ गड्यांनी पराभूत केले. भारताचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला. या विजयामुळे या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची भारताची आशा कायम आहे. भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेचा संघ ७ बाद १०७ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले.

 

भारत अव्वलस्थानी
भारत, पाकिस्तान, बांगलादेशचे ४-४ सामन्यांत ६-६ गुण झाले आहेत. मात्र, भारताची सरासरी सर्वाधिक असून तो अव्वलस्थानी आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात शनिवारी भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल.

 

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ७ बाद १०७ धावा.  (हसीनी परेरा ४६*, यशोदा मेंडिस २७, एकता बिष्ट २/२०).

भारत : ३ बाद ११० धावा. (वेदा कृष्णमूर्ती २९*, हरमनप्रीत कौर २४, मिताली राज २३, अोशादी रणसिंघे १/१५).

 

बातम्या आणखी आहेत...