आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला क्रिकेट : स्मृतीचे शतक, टीम इंडियाचा 2-0 ने वनडे मालिका विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंबर्ली- स्मृती मानधनाच्या जबरदस्त शतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका संघावर दुसऱ्या वनडे सामन्यात १७८ धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीत कौर आणि व्ही. कृष्णमूर्तीने अर्धशतके झळकावली.  


प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ३ बाद ३०२ धावा उभारल्या. यात सलामीवीर पूनम राऊत २० धावा करून परतली. स्मृती मानधनाने शतक ठोकले. तिने १२९ चेंडूत १३५ धावा चोपल्या. या खेळीत तिने १४ चौकार व १ षटकार खेचला. कर्णधार मिताली राज (२०) मोठी खेळी करू शकली नाही. हरमनप्रीत कौरने ६९ चेंडूत नाबाद ५५ धावा जोडल्या. कृष्णमूर्तीने फटकेबाजी करत ३३ चेंडूंत नाबाद ५१ धावा ठोकल्या. क्लास व लुसने प्रत्येकी एक विकेट घेतली.  
लीची एकाकी झुंज :  प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव ३०.५ षटकांत १२४ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर ली हिने एकाकी झुंज देत ७३ धावांची खेळी केली. पूनम यादवने ४ बळी घेतले. 

 

झुलन बनली २०० बळी घेणारी पहिली गोलंदाज
झुलन गोस्वामी वनडे क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज बनली. तिने बुधवारी दुसऱ्या वनडेत द. आफ्रिकेच्या लॉराला बाद करत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. तिचा हा १६६ सामना होता. ३५ वर्षीय झुलनने कसोटीत ४०, टी-२० मध्ये ५० बळी घेतले आहे.

 

> १३५ धावांची स्मृती मानधनाची खेळी
> ५५ नाबाद धावा हनमनप्रीतच्या

बातम्या आणखी आहेत...