• Home
  • Sports
  • Women's Twenty20: Harmanpreet leads in Super Over to challenge trailblazers

Womens T20: हरमनप्रीतच्या / Womens T20: हरमनप्रीतच्या नेतृत्वात 3 गड्यांनी सुपरनाेवाजची ट्रेलब्लेजर्सवर मात

महिला टी -२०: हरमनप्रीतच्या नेतृत्वात 3 गड्यांनी सुपरनाेवाजची ट्रेलब्लेजर्सवर मात.महिला टी -२०: हरमनप्रीतच्या नेतृत्वात गड्यांनी सुपरनाेवाजची ट्रेलब्लेजर्सवर मात.हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली सुपरनाेवाज संघाने मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शानदार विजयाची नाेंद केली. या संघाने एकमेव टी-२० सामन्यात स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेजर्सचा पराभव केला. सुपरनाेवाजने ३ गड्यांनी सामना जिंकला. अष्टपैलू कामगिरी करणारी ट्रेलब्लेजर्सची सुझी बेट्स (३२ धावा, २ विकेट) सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

May 23,2018 11:09:00 AM IST

मुंबई - हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली सुपरनाेवाज संघाने मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शानदार विजयाची नाेंद केली. या संघाने एकमेव टी-२० सामन्यात स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेजर्सचा पराभव केला. सुपरनाेवाजने ३ गड्यांनी सामना जिंकला. अष्टपैलू कामगिरी करणारी ट्रेलब्लेजर्सची सुझी बेट्स (३२ धावा, २ विकेट) सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
सलामीवीर मिताली राज (२२) अाणि व्याटच्या (२४) शानदार कामगिरीच्या बळावर सुपरनाेवाजने सामना जिंकला.
स्मृतीच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेजर्स संघाने ६ बाद १२९ धावांची खेळी केली हाेती. प्रत्युत्तरात सुपरनाेवाज संघाने ७ गड्यांच्या माेबदल्यात १३० धावा काढल्या.
धावांचा पाठलाग करणाऱ्या सुपरनाेवाजला सलामीवीर मिताली अाणि व्याटने दमदार सुरुवात केली. त्यांनी ४७ धावांची भागीदारी रचली.


सुझी ठरली सामनावीर
सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ट्रेलब्लेजर्सच्या सुझी बेट्सला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. तिने फलंदाजी करताना ३२ धावांची खेळी केली. तसेच गाेलंदाजीतही लक्षवेधी कामगिरी केली. तिने दाेन विकेट घेतल्या. यासह तिने सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, तिला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.

प्रयाेग यशस्वी

पुरुष टीम लीगच्या धर्तीवरच अाता पुढच्या वर्षी महिलांची अायपीएल अायाेजनाचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा मानस अाहे. त्यासाठीची रंगीत तालीम म्हणून या सामन्याचे अायाेजन करण्यात अालेे. महिलांच्या या एकमेव सामन्यासाठी इंग्लंड अाणि अाॅस्ट्रेलिया महिला संघातील खेळाडूही सहभागी झाल्या हाेत्या.

X