आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही होती ती क्रिकेट मॅच, ज्यात एका चेंडूवर काढल्या होत्या 20 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट मॅचमध्ये रोज काहींना काही विक्रम बनत असतात ते तुटत असतात. मात्र, काही रेकॉर्ड असे बनतात ज्यावर विश्वासच बसत नाही की अखेर हे कसे होऊ शकते. 'क्रिकेटमध्ये 'अजब-गजब' सीरीजमध्ये असाच एक रेकॉर्डबाबत माहिती घेणार आहोत. जरा विचार करा की, काय एका बॉलवर 20 धावा काढणे शक्य आहे? याचे उत्तर आहे होय, शक्य आहे. अशा निघाल्या एका चेंडूत 20 धावा....

 

- प्रकरण झटपट क्रिकेटमधील बिग बॅश लीग फॉर्मेटमधील आहे. वर्ष 2012 मध्ये होबार्ट हरीकेन्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्या दरम्यान मॅच खेळली गेली ज्यात ट्रॅव्हिस बर्ट नावाच्या फलंदाजाने क्लाईंट मॅकेच्या एका चेंडूवर 20 धावा कुटल्या.

 

- याचे झाले असे की क्लाईंट मॅकेने शेवटच्या चेंडू आधी दोन नो बॉल टाकले होते. पहिल्या आणि दुस-या चेंडूवर बर्टने षटकार ठोकले. म्हणजे 12 धावा नो बॉलच्या 2 अशा 14 धावा झाल्या.

 

- यानंतर मॅकेने शेवटचा चेंडू ठीक टाकला पण बर्टने त्यालाही स्टेडियममध्ये भिरकावून दिले. अशा रीतीने मॅकेच्या एका चेंडूवर 20 धावा लुटल्या गेल्या.

बातम्या आणखी आहेत...