Home | Sports | From The Field | rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018

IPL-11 DD vs RR: राजस्‍थान रॉयल्‍सचा 10 धावांनी विजय, दिल्‍लीचा सलग दुसरा पराभव

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2018, 06:48 AM IST

आयपीएलमध्ये आज दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये दमदार सामना पहायला मिळणार आहे. जयपूर येथील सवाई मानसिंह स्

 • rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018

  जयपूर - आयपीएल ११ च्या सत्रात गुरुवारी पावसाच्या व्यत्ययानंतर राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १० धावांनी मात केली. या आयपीएलमध्‍ये दिल्‍लीचा हा सलग दुसरा पराभव आहे.


  प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १७.५ षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने खेळ थांबला. त्यानंतर डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे दिल्लीला ६ षटकांत ७१ धावांची लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात दिल्ली संघ ६ षटकांत ४ बाद ६० धावा करू शकला. सलामीवीर कॉलिन मुनरो भोपळाही फोडू शकला नाही. सलामीवीर ग्लेन मॅक्सवेल १२ चेंडूत २ चौकार व एक षटकार खेचत १७ धावांवर परतला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने २० धावा ठोकल्या. विजय शंकर ३ धावांवर बाद झाला. क्रिस मॉरिसने नाबाद १७ धावा केल्या.

  राजस्थानच्या जयदेव उनाडकटने एक आणि लाफलिनने २० धावांत २ गडी बाद केले. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने ४० चेंडूत ४५ धावा केल्या. स्टोक्सने १६, संजू सॅमसनने ३७, बटलरने २९ धावा काढल्या. राहुल त्रिपाठी नाबाद १५ आणि के. गौतम २ धावांवर नाबाद राहिला. शाहबाज नदीमने २ गडी टिपले.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक व फोटोज...

 • rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018
 • rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018
  जयपूरमध्‍ये पावसामुळे खेळ थांबवण्‍यात आला आहे.
 • rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018
 • rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018
 • rajasthan Royals Vs Delhi Daredevils, IPL 2018

Trending