आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोहान्सबर्ग- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंगवर अखेर निर्णय जाहीर केला. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर प्रत्येकी एक-एक वर्ष आणि कॅमरून बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली. वॉर्नर आजीवन कर्णधार बनू शकणार नाही. स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट एक वर्षाच्या बंदीनंतर एक वर्षापर्यंत कर्णधार बनू शकणार नाहीत. सहकारी खेळाडू आणि चाहते जेव्हा परवानगी देतील, तेव्हाच ते कर्णधार बनू शकतील. हे खेळाडू सीएद्वारे लावण्यात आलेल्या बंदीवर ऑस्ट्रेलियात आव्हान देऊ शकतात. त्यांनी असे केल्यास एक स्वतंत्र समिती सुनावणी घेईल.
या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनेक महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला. बॉल टेम्परिंगचे पूर्ण नियोजन डेव्हिड वॉर्नरने केले असल्याचे सीएच्या चौकशीत समोर आले. त्याने बेनक्रॉफ्टला चेंडू कशा प्रकारे खराब करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हे सर्व स्मिथच्या समोर घडले, त्याने दोघांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
स्मिथला ४३ कोटी, वॉर्नरला ४१ कोटींचे होणार नुकसान :
बंदीमुळे स्टीव्ह स्मिथला ४३ कोटी रुपये आणि डेव्हिड वॉर्नरला ४१ कोटी रुपये नुकसान होईल. यात आयपीएलद्वारे मिळणारा पैसा, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कराराची रक्कम, जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या पैशाचा समावेश आहे.
पुढे काय: स्मिथ व वॉर्नरला निर्णयाविरुद्ध अपिलाची संधी
- ज्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. त्यांनी असे केल्यास एका स्वतंत्र समितीसमोर त्याची सुनावणी होईल.
- ही सुनावणी सार्वजनिक होईल की नाही, हे खेळाडूंच्या हाती नाही.
- सुनावणीच्या वेळी खेळाडू बाजू मांडण्यासाठी कितीही साक्षीदार बोलावू शकतात आणि कितीही वकील लावू शकतात.
स्मिथचा खोटारडेपणा सिद्ध
स्मिथचा दावा
- टेम्परिंगचा निर्णय लीडरशिपच्या ग्रुपने घेतल्याचे म्हटले
- ब्रेनक्रॉफ्टने अॅडहेसिव्ह टेपद्वारे टेम्परिंग केली, असे सांगितले होते.
- पकडले गेले नसते, तरी आम्हाला पश्चात्ताप झाला असता
सत्य
- वॉर्नर मास्टरमाइंड, स्मिथचे समर्थन होते.
- बेनक्रॉफ्टने सँड पेपरने टेम्परिंग केली.
- मैदानाबाहेरील १२ व्या खेळाडूने जेव्हा संदेश दिला, तेव्हा स्मिथने बेनक्रॉफ्टला सँड पेपर लपवण्यास सांगितले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, या मालिकांपासून दूर स्मिथ व वॉर्नर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.