आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी काेमचा गाेल्डन पंच, धीरजने रचला इतिहास; ८८ वर्षांत भारतीय संघ पहिल्यांदा विदेशात सरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेल्ड काेस्ट- पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी काेम अाणि युवा भालाफेकपटू नीरज चाेप्राने शनिवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एेतिहासिक सुवर्णपदके मिळवून दिली. त्यांनी अापल्या गटात सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला. मेरी काेमने पहिल्यांदाच अाणि नीरजने भालाफेकमध्ये भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय बाॅक्सर गाैरव साेळंकी, विकास कृष्णन, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, नेमबाज संजीव राजपूत, कुस्तीपटू विनेश फाेगट, सुमीतने सुवर्णपदके जिंकली. यासह भारताने दहाव्या दिवशी १७ पदके जिंकली. यामध्ये अाठ सुवर्णचा समावेश अाहे. भारताने ८८ वर्षात प्रथम विदेशात हे यश मिळवले.

 

टेटे : मनिकाने पहिले सुवर्णपदक जिंकले

भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा महिला एकेरीमध्ये चॅम्पियन ठरली. तिने या गटात सुवर्णपदक पटकावले. तिने फायनलमध्ये सिंगापूरच्या मेंगयूवर ११-७, ११-६, ११-२, ११-७ ने मात केली. तसेच हरमीत-सानिलने कांस्य अाणि शरथ-साथियानने राैप्यपदक पटकावले. 

 

बॅडमिंटन : अश्विनी-रेड्डीला कांस्यपदक

अश्विनी पाेनप्पा अाणि सिक्की रेड्डीने भारताला बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकून दिले. त्यांनी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात अाॅस्ट्रेलियाच्या सेतयाना मापासा अाणि ग्राेन्यावर मात केली. त्यांनी ४७ मिनिटांत २१-१९, २१-१९ ने सामना जिंकून कांस्य अापल्या नावे केले.

 

 २५ सुवर्णपदकांसह निर्माण केला दबदबा

सुवर्णपदक विजेते : मेरी काेम, विकास कृष्णन, गाैरव साेळंकी (बाॅक्सिंग), विनेश फाेगट, सुमीत (कुस्ती), नीरज चाेपडा (अॅथलेटिक्स), मनिका बत्रा (टेटे), संजीव राजपूत (नेमबाजी).  

राैप्यपदक : अमित, मनिष (बाॅक्सिंग),  सतीश (कुस्ती), दीपिका- साैरव (स्क्वॅश),  शरथ-साथियान, (टे.टे.)

कांस्य: साक्षी मलिक, साेमवीर (कुस्ती), अश्विनी पाेनप्पा-सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), हरमीत-सानिल. (टे.टे.) 

 

अॅथलेटिक्स : चॅम्पियन नीरज पहिला भालाफेकपटू

भालाफेकमध्ये पहिले सुवर्णपदक : युवा नीरज चाेपडाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एेतिहासिक साेनेरी यश संपादन केले. त्याने पुरुषांच्या भालाफेक प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यासह त्याने अातापर्यंतच्या स्पर्धेतील सहभागाच्या इतिहासामध्ये पहिल्यादा या प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने फायनलमध्ये ८६.४७ मीटर भालाफेक केला. यासह ताे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. याशिवाय या स्पर्धेतील भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला.   
पाचवे साेनेरी यश :  अॅथलेटिक्समध्ये भारताचे हे पाचवे साेनेरी यश ठरले.  नीरजने सुवर्ण मिळाले. यापूर्वी मिल्खा सिंग (१९५८) कृष्णा पुनियाने २०१० मध्ये दिल्लीत, भारतीय महिला टीम, विकास गाैडाने (२०१४) सुवर्णपदक पटकावले.

 

कुस्ती :  विनेश, सुमीत विजेते; साक्षीने जिंकले कांस्य

विनेश, सुमीतने काढला सुवर्णपट : भारताच्या कुस्तीपटू विनेश फाेगट अाणि सुमीतने अापापल्या वजन गटामध्ये सुवर्णपट काढला. विनेशने ५० किलाे वजन गटात कॅनडाच्या जेसिका मॅक्डाेनाल्डला धूळ चारली. विनेशने अापल्या गटाच्या फायनलमध्ये १३-३ ने विजय संपादन करून अव्वल स्थान गाठले. त्यापाठाेपाठ सुमीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 
साक्षी, साेमवीरला कांस्य : अाॅलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक अाणि युवा मल्ल साेमवीरला महिलांच्या कुस्ती प्रकारात कांस्यपदकाची कमाई करता अाली. त्यांनी अापापल्या गटात तिसरे स्थान गाठले. साक्षीने ६२ किलाे वजन गटात न्यूझीलंडच्या टेलर फाेर्डवरने ६-५ ने मात केली. साेमवीरने ८६ किलाे वजन गटात कांस्यचा मान मिळवला.  

 

बाॅक्सिंग : तीन सुवर्णांसह भारताला दाेन राैप्यपदके मिळाली

विकासला सुवर्ण : भारताच्या विकास कृष्णनने भारताला बाॅक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या ७५ किलाे वजन गटामध्ये हे साेनेरी यश संपादन केले. त्याने फायनलमध्ये कॅमरूनच्या दियुदाेन विल्फ्रे सेयीला धूळ चारली. त्याने ५-० ने सामना जिंकला. यासह ताे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

मेरी काेमला पहिले सुवर्ण : पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी काेमने अापल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत गाेल्डन पंच मारला. तिचे या स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले. तिने शनिवारी ४५ ते ४८ किलाे वजन गटाच्या फायनलमध्ये अायर्लंडच्या क्रिस्टिनाला पराभूत केले. तिने ५-० ने सामना जिंकला.

गाैरव साेळंकी चॅम्पियन : भारताचा बाॅक्सर गाैरव साेळंकी पुुरुषांच्या ५२  किलाे वजन गटात चॅम्पियन ठरला. त्याने या गटामध्ये अायर्लंडच्या ब्रॅडन इरविनवर मात केली. त्याने ४-१ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह त्याने सुवर्णपदकाची कमाई केली.   

अमित, मनीषला राैप्यपदके : अमितने ४६ ते ४९ किलाे अाणि मनीष काैशिकने ६० किलाे वजन गटात राैप्य जिंकले. अमितला फायनलमध्ये इंग्लंडच्या यफाईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ताे राैप्यचा मानकरी ठरला. मनीष काैशिकची फायनलमधील झुंज अपयशी ठरली. त्याला  हॅरी गारसाइडने ३-२ ने पराभूत केले.

 

नेमबाजी : संजीवला सुवर्ण; चैन अपयशी 

भारताच्या संजीव राजपूतने नेमबाजीमध्ये संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझीशन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ४५४.५ गुणांसह अव्वल स्थान गाठले. त्याने पात्रता फेरीत विक्रमी ११८० गुण संपादन केले हाेते. या गटात भारताचा चैन सिंग पाचव्या स्थानावर राहिला.

 

स्क्वॅश : दीपिका-साैरव दुसऱ्या स्थानी

दीपिका - साैरव घाेषालने स्क्वॅशमध्ये भारताला राैप्यपदक मिळवून दिले. त्यांनी मिश्र दुहेरीमध्ये दुसरे स्थान गाठले. त्यांना फायनलमध्ये सिंगापूरच्या डाेना-कॅमरूनने हरवले. त्यामुळे भारताची जाेडी दुसऱ्या स्थानी राहिली. 

 

पदक तालिका: टॉप 5 देश

देश गोल्ड सिल्वर ब्रॉन्ज एकूण
ऑस्ट्रेलिया 67 50 55 172
इंग्लंड 34 35 37 106
भारत 20 12 14 46
कॅनडा 14 35 26 75
दक्षिण अाफ्रिका 13 10 12

35

* ही तालिका भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी 9:23 पर्यंत अपडेट आहे.

बातम्या आणखी आहेत...