आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolls Cheteshwar Pujara After His Very Slow Batting In Johannesburg

54 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव काढली पुजाराने, फॅन्स म्हणाले- झाली की हाफ सेंन्चुरी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरीजमधील तिसरा आणि अखेरची मॅच सध्या जोहान्सबर्ग येथे खेळली जात आहे. मॅचमध्ये चेतेश्वर पुजाराच्या स्लो बॅटिंगवरून सोशल मीडियात त्याची खूप खिल्ली उडविली जात आहे. लोकेश राहुल शून्यावर बाद होताच पुजारा बॅटिंग करायला आला, मात्र तो खूपच स्लो खेळत होता. त्याच्या या स्लो बॅटिंगचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता जेव्हा त्याला पहिली धाव काढण्यासाठी तब्बल 54 बॉल खेळावे लागले. त्यामुळे क्रिकेट फॅन्सनी त्याची खूपच खिल्ली उडविली. फॅन्सने त्याच्यासाठी लिहले की, अशी स्लो बॅटिंग पाहून कासवाला सुद्धा लाज वाटेल. भारताची खराब सुरूवात...

 

- मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात मात्र खराब झाली आणि फक्त 13 धावांवर दोन्ही सलामीवीर बाद झाले.
- पहिली विकेट लोकेश राहुलची गेली जो, 3.1 षटकात शून्यावर बाद झाला. फिलेंडरच्या बॉलवर त्याचा डिकॉकने झेल घेतला.
- यानंतर दुसरी विकेटसुद्धा लगेच गेली. 8.4 षटकात रबाडाने मुरली विजयला डिकॉकने झेलबाद केले. तो 8 धावा काढून बाद झाला.
- मागील मॅचमध्ये दोन्ही डावात पुजारा धावबाद झाला होता. त्यावेळी सुद्धा त्याची खूप खिल्ली उडविली गेली होती. तर, आता संथ फलंदाजी केल्याने पुन्हा एकदा फॅन्सच्या निशाण्यावर आला आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पुजाराच्या संथ फलंदाजीनंतर आलेल्या सोशल मीडियात फनी कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...