आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolls Shikhar Dhawan For His Twit On Shoaib Malik Health Issue

शिखर धवनकडून सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकची विचारपूस, भडकले इंडियन फॅन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानी क्रिकेटर आणि इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक नुकताच न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या वनडेत जखमी झाला. फील्डरचा थ्रो थेट त्याच्या डोक्यावर आदळला. ज्यानंतर तो मॅच खेळू शकला नाही. त्याला झालेल्या दुखापतीनंतर इंडियन स्टार क्रिकेटर शिखर धवनने ट्वीट करत शोएबच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. धवनचा हा अंदाज दोन्ही देशांतील बहुतेक फॅन्सला खूप भावला. मात्र, काही फॅन्स असेही आहेत ज्यांनी धवनला पाकिस्तानी क्रिकेटर व सानियाच्या पतीची विचारपूस करणे भावले नाही. फॅन्सनी धवनला दिला सल्ला...

 

- धवनने शोएब मलिकची विचारपूस करत ट्वीट केले की, 'जनाब शोएब मलिक उम्मीद है आप ठीक हो रहे होंगे और जल्द ही अच्छे होकर फील्ड पर वापसी करेंगे। अपना ध्यान रखना।'
- इंडियन क्रिकेटरच्या या ट्विटनंतर फॅन्सनी त्याच्या खेळ भावनेचा जोरदार कौतूक केले. दोन्ही देशांतील फॅन्सनी त्याला भरपूर सपोर्ट मिळाला. 
- मुहम्मद उस्मान नावाच्या एका पाकिस्तानी फॅनने लिहले की, wow... इतनी गजब की स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखकर बेहद अच्छा लगा। आप हमेशा खुश रहें शिखर धवन। रिस्पेक्ट फ्रॉम पाकिस्तान।
- भारत-पाकिस्तानच्या फॅन्सशिवाय एका बांगलादेशी फॅनने सुद्धा धवनच्या या जेस्चरचे कौतूक केले.
- या फॅनने लिहले, 'दोन्ही देशांतील खेळाडूंदरम्यान अशा प्रकारची स्पोर्ट्समनशिप पाहून खूपच चांगले वाटले. ते वेस्टर्न देश आणि चीन आहेत जे आपल्या फायद्यासाठी भारत आणि पाकिस्तानला एकमेंकाविरूद्ध भडकवतात. एक बांगलादेशी असण्याच्या नात्याने मी भारत आणि पाकिस्तानी भावांत शांतता नांदताना पाहू इच्छितो.'

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धवनच्या ट्विटनंतर कशा पद्धतीने काही फॅन्सनी त्याला ट्रोल केले...

बातम्या आणखी आहेत...