आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricketer Michael Hussey Appointed As The Batting Coach Of Chennai Super Kings

धोनीच्‍या टीममध्‍ये या ऑस्‍ट्रेलियन खेळाडूला मिळाली मोठी संधी, बनायचे होते शिक्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्‍नई सुपरकिंग्‍सने IPL 2018 सीझनसाठी मायकल हसीची कोच म्‍हणून निवड केली आहे. - Divya Marathi
चेन्‍नई सुपरकिंग्‍सने IPL 2018 सीझनसाठी मायकल हसीची कोच म्‍हणून निवड केली आहे.

स्‍पोर्ट्स डेस्‍क- 2 वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा विजेता संघ चेन्‍नई सुपर किंग्‍सने आगामी 11व्‍या सीझनसाठी ऑस्‍ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीची टीमसाठी बॅटिंग कोच म्‍हणून निवड केली आहे. CSKच्‍या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन याची माहिती देण्‍यात आली. विशेष म्‍हणजे CSKच्‍या टीममध्‍ये मायकल हसी पूर्वी फलंदाज म्‍हणून खेळलेला आहे.


सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज
- याबाबत CSKच्‍या ट्विटर म्‍हणले आहे की, 'मायकल हसीचे पुन्‍हा एकदा टीममध्‍ये स्‍वागत. तुमच्‍या येण्‍यामुळे टीमसाठी येणारे सीझन पुन्‍हा एकदा सर्वोत्‍कृष्‍ट राहिल. बॅटिंग कोच म्‍हणून चेन्‍नईच्‍या संघात तुमचा समावेश केला जात आहे.'
- 42 वर्षांच्‍या हसीने IPLमध्‍ये चमकदार कामगिरी केली आहे. चेन्‍नईकडून 64 सामने खेळताना त्‍याने 2213 धावा केल्‍या आहेत. सरेश रैना (4541) आणि महेंद्रसिंग धोनीनंतर (3436) टीमसाठी सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. 2013मध्‍ये हायेस्‍ट स्‍कोरर राहिल्‍याने त्‍यांना ऑरेंज कपही मिळालेला आहे.
- हसीने आयपीलच्‍या सातव्‍या सीझनमध्‍ये चेन्‍नईकडून खेळायला सुरुवात केली. 2008, 2013 आणि 2015मध्‍ये हसी चेन्‍नईकडून खेळला. त्‍यानंतर 2014मध्‍ये त्‍याला मुंबई इंडियन्‍सने खरेदी केले.
- 2 वर्षांच्‍या बंदीनंतर चेन्‍नई या सीझनमध्‍ये पुन्‍हा आयपीएलमध्‍ये खेळत आहे. 4 जानेवारीला टीम मॅनेजमेंटने टीमचे पूर्व खेळाडू एमएस धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा यांना रिटेन केले आहे.


शिक्षक बनता बनता बनला क्रिकेटर
- प्रोफेशनल क्रिकेटर बनण्‍यापूर्वी मायकलने विज्ञानाचे शिक्षक बनण्‍याचे प्रशिक्षण घेतले होते. नंतर मात्र त्‍याने क्रिकेटमध्‍येच करिअर केले.
- मायकल हसीच्‍या बायकोचे नाव एमी आहे. त्‍यांना 4 मुले आहेत. त्‍याचे वडील अॅथेलेटिक्‍स कोच राहिलेले आहेत. त्‍याचा भाऊ डेव्हिड हसीही ऑस्‍ट्रेलियाच्‍या क्रिकेट टीममध्‍ये होता.
- शाळेतील शिक्षण संपल्‍यानंतर हसीला ऑस्‍ट्रेलियाच्‍या क्रिकेट अकादमीची स्‍कॉलरशीप मिळाली होती. यामध्‍ये त्‍याच्‍यासोबत ब्रेट ली आणि जेसन गिलेस्‍पीही होते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या....मायकल हसीच्‍या जीवनाशी संबंधित काही फॅक्‍टस...

 

बातम्या आणखी आहेत...