आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर वन इंग्लंडने रचली विश्वविक्रमी धावसंख्या; वनडेत ६ बाद ४८१ धावांसह रचला इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या यजमान इंग्लंड संघाने मंगळवारी घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत ४८१ धावसंख्या उभी केली. सलामीवीर ब्रेयस्ट्राे (१३९), हेल्स (१४७)अाणि जेसन राॅय (८२) यांनी झंझावाती खेळी केली. त्यामुळे इंग्लंडच्या नावे विक्रमाची नाेंद झाली. 


इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या माेबदल्यात हा विक्रम रचला. यापूर्वीचा वनडेत सर्वाेच्च ३ बाद ४४४ धावांचा विक्रम हाेता. हा विक्रमही इंग्लंडच्या नावे हाेता. या टीमने ३० अाॅगस्ट २०१६ मध्ये पाकविरुद्ध ही धावसंख्या उभी केली हाेती. 


टायच्या ९ षटकांत १०० धावा
अाॅस्ट्रेलियाच्या अॅण्ड्र्यु टायने गचाळ गाेलंदाजी करताना ९ षटकांत १०० धावा दिल्या. तसेच रिचर्डसनने १० षटकांत ९२ धावा देताना तीन विकेट घेतल्या. स्टाेईनिसने ८ षटकांत ८५ धावा दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...