Home | Sports | From The Field | England scored 285 for nine

इंग्लंड संघाच्या ९ बाद २८५ धावा; रविचंद्रन अश्विनने टिपले चार बळी

वृत्तसंस्था | Update - Aug 02, 2018, 07:31 AM IST

इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी लढतीत पहिल्या दिवसअखेर ८८ षटकांत ९ बाद २८५ धावा काढल्या.

 • England scored 285 for nine
  इंग्लंडचा सलामीवर अॅलिस्टर कुकला बाद केल्यानंतर अश्विनचे अभिनंदन करताना कर्णधार विराट कोहली.

  बर्मिंगहॅम- कर्णधार ज्यो रूट ८० आणि बेयरस्टो ७० यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी लढतीत पहिल्या दिवसअखेर ८८ षटकांत ९ बाद २८५ धावा काढल्या. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जेवणापर्यंत २८ षटकांत १ बाद ८३ धावा केल्या होत्या.


  ज्यो रूटने कर्णधाराला साजेशी खेळी करत अर्धशतक झळकावले. रूटने १५६ चेंडंूत ९ चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. बेयरस्टोने ८८ चेंडूचा सामना करताना ९ चौकार खेचत ७० धावा जोडल्या. स्टोकने ४१ चेंडूंत २१ आणि राशिदने १३ धावा काढल्या. आठव्या स्थानावर असलेल्या कुरणने टिच्चून फलंदाजी करत पहिल्या दिवशी संघाचा डाव संपुष्टात येण्यापासून रोखले. त्याने ६७ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांसह नाबाद २४ धावा केल्या. गोलंदाज जेम्स अँडरसन शून्यावर खेळत आहे. रूटने आपले अर्धशतक १०७ चेंडूंत पूर्ण केले. त्याने आपल्या डावात ४० धावा करताच ७० कसोटीत ६ हजार धावादेखील पूर्ण केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची नाबाद भागीदारी रचली. सलामीवीर अॅलिस्टर कुकला अश्विनने १३ धावांवर असताना टिपले. जेनिंग्जने ९८ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ४२ धावा काढल्या. मलान केवळ ८ धावा करू शकला. कुकने २८ चेंडूंत १३ धावा करताना २ चौकार लगावले. भारताच्या अश्विनने ६० धावा देत ४ फलंदाज टिपले. मो. शमीने २, उमेश यादव व ईशांत शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.


  फिरकीपटूने घेतली ३२ वर्षांनी पहिली विकेट
  सामन्यात पहिली विकेट रविचंद्रन अश्विनने घेतली. त्याने अॅलिस्टर कुकला त्रिफळाचीत केले. ३२ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय फिरकीपटूने पहिली विकेट घेतली होती. त्यानंतर १९८६ मध्ये मनिंदरसिंगने कसोटी मालिकेत पहिला बळी घेतला. भारताने हा सामना ५ गड्यांनी आणि मालिका १-० ने जिंकली होती. कुक भारताविरुद्ध चार मालिकांत सर्वात पहिल्यांदा बाद झाला आहे.


  आर. अाश्विनने आठव्यांदा कुकला केले बाद
  भारताचा फिरकीपटू आर. अाश्विनने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकला आठव्यांदा बाद केले. अश्विनने कुकला जेवणापूर्वी १३ धावांवर असता त्रिफळाचीत केले. अश्विनने १२ कसोटींत आठव्यांदा कुकला तंबूचा रस्ता दाखवला. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मानेदेखील १३ कसोटीत आठ वेळा बाद केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १५७ सामन्यांत १२१५८ धावा करणाऱ्या कुकला द. अाफ्रिकेच्या मोर्न मॉर्केलने १९ कसोटीत १२ वेळा बाद केले.

Trending