Home | Sports | From The Field | England won the second and final T-20 match

इंग्लंडची मालिकेत बराेबरी; भारतावर ५ गड्यांनी मात

वृत्तसंस्था | Update - Jul 07, 2018, 07:56 AM IST

यजमान इंग्लंडने घरच्या मैदानावर ५ गड्यांनी सामना जिंकला. यासह इंग्लंडने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी

  • England won the second and final T-20 match

    कार्डिफ- सलामीच्या पराभूत सावरलेल्या यजमान इंग्लंड संघाने शुक्रवारी पाहुण्या टीम इंडियाला राेखले. यासह इंग्लंडने दुसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यात शानदार विजय संपादन केला. यजमान इंग्लंडने घरच्या मैदानावर ५ गड्यांनी सामना जिंकला. यासह इंग्लंडने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. अाता मालिकेतील तिसरा अाणि निर्णायक सामना रविवारी ८ जुलै राेजी रंगणार अाहे.


    भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १४८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने गड्यांच्या माेबदल्यात विजयाने लक्ष्य सहज गाठले. हेल्सच्या (५८*) झंझावाती खेळीच्या बळावर इंग्लंडने हा सामना जिंकला. काेहलीचा कर्णधाराच्या भुमिकेत हा १०० वा सामना हाेता. तसेच माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनीने करिअरमधील ५०० वा सामना खेळला.

Trending