आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडला पराभवाच्या परतफेडीसाठी काेहली सरेसाेबत करारबद्ध; ३ जुलैपासून इंग्लंड दाैरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाता इंग्लंडमध्येच कसून सराव करत यजमानांना गतवर्षीच्या दाैऱ्यातील पराभवाची परतफेड करणार अाहे. यासाठी त्याने अाता थेट इंग्लंडमध्येच खेळण्याचा निर्णय घेतला. यातून त्याने नुकताच इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे अाता सरे संघासाेबत करारबद्ध झाला अाहे. या संघाकडून अाता ताे काउंटी क्रिकेटमध्ये अापले काैशल्य पणास लावेल. अवघा जून महिना ताे या ठिकाणी खेळणार अाहे. त्यानंतर जुलैमध्ये भारतीय संघ कसाेटी, वनडे अाणि टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा दाैरा करेल. दरम्यान, महिनाभरातील खेळण्याचा माेठा फायदा काेहलीला हाेईल.

 

यातूनच अापण यजमान इंग्लंडला सहजरीत्या गतवर्षीच्या पराभवाची परतफेड करू शकू, असा विश्वास त्याने व्यक्त केला. काउंटी क्रिकेटसाठी सरे संघाशी करारबद्ध झालेला काेहली हा भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला. कसोटी खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये यावर्षी इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा तो चौथा खेळाडू ठरणार आहे.  सध्या चेतेश्वर पुजारा याॅर्कशायर, इशांत शर्मा आणि वरुण अॅराेन हे युवा खेळाडू सध्या अनुक्रमे ससेक्स आणि लिस्टेशायर संघासाठी खेळत आहेत.  

 

३ जुलैपासून इंग्लंड दाैरा; पाच कसाेटी, तीन वनडेची मालिका 
टीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंडचा दाैरा करणार अाहे. या दाैऱ्यात भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका खेळणार अाहे. येत्या ३ जुलैपासून टी-२० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. त्यासाठी विराटने जून महिन्यात काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

 

इंग्लंडमधील वैयक्तिक  अपयशाला दूर सारणार

भारताचा कर्णधार विराट काेहलीची आतापर्यंतची इंग्लंडमधील कामगिरी खास अशी झालेली नाही. त्याने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांत १३.४० च्या सरासरीने १३४ धावाच केल्या आहेत.  त्यामुळे या दौऱ्याच्या आधी सराव म्हणून विराट सरेकडून काउंटी क्रिकेट खेळणार आहे. ९ जून ते २८ जूनदरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये सरे संघाचे ३ सामने होणार आहेत. यात सरेचा सामना हॅम्पशायर, सॉमरसेट आणि यॉर्कशायर या तीन संघाशी होणार आहे. या सामन्यांत खेळण्याची काेहलीला संधी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...