आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी: भारतीय पुरुष टीमचा मालिका विजय; महिलांनी यजमान इंग्लंडला राेखले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - अाशियाई चॅम्पियन भारतीय हाॅकी संघाने घरच्या मैदानावर शनिवारी पाहुण्या न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव केला. यासह यजमान भारताने या संघावर मालिका विजयाची नाेंद केली. दुसरीकडे इंग्लंडमध्ये विश्वचषक हाॅकी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत भारतीय महिलांनी सलामीच्या सामन्यात यजमान अाणि रिअाे अाॅलिम्पिक चॅम्पियन इंग्लंड संघाला बराेबरीत राेखले. भारत अाणि इंग्लंड यांच्यातील लढत १-१ ने बराेबरीत राहिली.

 

यजमान भारतीय पुरुष संघाने घरच्या मैदानावर मालिकेतील दुसऱ्या अाणि निर्णायक लढतीत ३-१ अशा फरकाने विजय संपादन केला. रुपिंदरपाल सिंग (१८ वा मि.), एस.व्ही. सुनील (२७ वा मि.) अाणि मनदीप सिंग (५६ वा मि.) यांनी प्रत्येकी एक शानदार गाेल केला. याच गाेलच्या बळावर भारताने सामना जिंकून मालिका अापल्या नावे केली. न्यूझीलंड संघासाठी २४ व्या मिनिटाला स्टीफन जेनेसने गाेल केला. मात्र, या टीमचा सामन्यातील हा एकमेव गाेल ठरला. यातूनच न्यूझीलंडला अापला पराभव टाळता अाला नाही. यासह भारतीय संघाने तीन हाॅकी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा अाणि शेवटचा सामना अाज रविवारी हाेणार अाहे.

 

रुपिंदर, सुनील, मनदीपने खेचली विजयश्री; न्यूझीलंडचा पराभव
सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या यजमान भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही अापला दबदबा कायम ठेवला. यातूनच यजमानांना पहिल्या क्वार्टरमध्येच सामन्यावरची अापली पकड अधिक मजबूत करता अाली. रुपिंदरने सुरेख खेळीच्या बळावर गाेल केला. यासह भारताने १८ व्या मिनिटाला सामन्यात १-० ने अाघाडी मिळवली. त्यानंतर सहा मिनिटांत न्यूझीलंडने बराेबरी साधली हाेती. मात्र, त्यानंतर ३ मिनिटांत सुनीलने भारताची अाघाडी निश्चित केली. त्यापाठाेपाठ मनदीपने गाेल केला.

 

नेहाचा सुरेख गाेल; इंग्लंडचे डावपेच अपयशी
लंडन- यजमान इंग्लंड संघाला घरच्या मैदानावर विजयासाठी अाखलेले डावेपच यशस्वी करता अाले नाहीत. स्पेनविरुद्धच्या मालिका विजयाने फाॅर्मात असलेल्या भारतीय महिलांनी यजमानांचे मनसुबे हाणून पाडले. यातूनच भारताने सामन्यात इंग्लंडला बराेबरीत राेखण्याची किमया साधली. त्यामुळे हा सामना १-१ ने बराेबरीत राहिला. नेहा गाेयलने (२५ वा मि.) भारतासाठी गाेल केला. इंग्लंडने ५४ व्या मिनिटाला गाेल केला हाेता. मात्र, त्यानंतरचा या टीमचा गाेलचा प्रयत्न अपयशी ठरला. यासह अाता दाेन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांचा दुसरा सामना अाता गुरुवारी अायर्लंडशी हाेणार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...