आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने अाता पुन्हा एकदा विक्रमाला गवसणी घातली. त्याने अापल्या उल्लेखनीय कामगिरीची लय कायम ठेवताना अायसीसीच्या पुरस्कारांमध्ये विक्रम केला. त्याने एकाच वर्षात अायसीसीच्या चार पुरस्कारांचा बहुमान पटकावला. अशा प्रकारे काेहली हा विराट पाच पुरस्कारांचा एकाच वेळी मानकरी ठरलेला पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने चार गटात बाजी मारली. याशिवाय त्याने पहिल्यांदा ताे अायसीसीच्या कसाेटी फलंदाजांच्या क्रमवारीत ९०० गुणांचा अाकडा पार केला अाहे. त्यामुळे त्याला ही अपूर्व अशी कामगिरी अापल्या नावे करता अाली अाहे.अशा प्रकारे एकाच वेळी चार पुरस्कार जिंकणारा ताे पहिलाच खेळाडू अाहे. यापूर्वी, धाेनी अाणि रिकी पाॅटिंगने प्रत्येकी तीन वेळा हे पुरस्कार पटकावले अाहेत.
असा ठरला मानकरी
काेहलीला २०१७ च्या प्लेअर अाॅफ इयर (सर गारफिल्ड साेबर्स ट्राॅफी) अाणि वनडे प्लेअर अाॅफ इयरचा पुरस्कार जाहीर केला. याशिवाय त्याच्याकडे अायसीसीच्या कसाेटी टीम अाणि वनडे टीम अाॅफ द इयरचे नेतृत्व साेपवण्यात अाले. अशा प्रकारे त्याचा या पुरस्काराने गाैरव करण्यात येईल.
खेळाडूंचा गाैरव
- यजुवेंद्र चहलला टी-२० परफाॅर्मेन्स अाॅफ इयर पुरस्कार जाहीर झाला.
- पुरुष कसाेटी टीममध्ये विराट काेहलीसह अार.अश्विन अाणि चेतेश्वर पुजाराचा समावेश.
- महिला वनडे टीममध्ये मिताली व एकता बिस्ट.
- महिला टी-२० संघात एकता व हरमनप्रीत.
अायसीसी कसाेटी टीम
विराट काेहली (कर्णधार), डीन एल्गर, डेव्हिड वाॅर्नर, स्टीव्हन स्मिथ, चेतेश्वर पुजारा, बेन स्टाेक्स, क्विंटन डिकॅक, मिशेल स्टार्क, अार. अश्विन, कागिसाे रबाडा, अॅडरसन.
- वनडे टीम : डेव्हिड वाॅर्नर, राेहित शर्मा, विराट काेहली, बाबर अाझम, डिव्हिलियर्स, क्विंटन डिकाॅक, बेन स्टाेक्स, ट्रेंट बाेल्ट, रशिद खान, हसन अली, बुमराह.
सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूला गारफिल्ड साेबर्स ट्राॅफी
काेहलीने प्लेअर अाॅफ द इयर (सर गारफिल्ड साेबर्स ट्राॅफी) पुरस्कार पटकावला. यासह ताे हा पुरस्कार जिंकणारा चाैथा भारतीय क्रिकेटपटू ठरला. याशिवाय सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्काराचा मानकरी ठरला. गत वर्षी अार. अश्विनला या पुरस्काराने गाैरवण्यात अाले हाेते.
पुरस्कार विजेते खेळाडू
- क्रिकेेटर अाॅफ द इयर : विराट काेहली (भारत)
- टेस्ट प्लेअर
अाॅफ द इयर : स्टीव्हन स्मिथ (अाॅस्ट्रेलिया)
- वनडे प्लेअर अाॅफ द इयर : विराट काेहली (भारत)
- टी-२० परफाॅर्मेन्स अाॅफ द इयर : यजुवेंद्र चहल (भारत)
- एमर्जिंग प्लेअर अाॅफ द इयर : हसन अली (पाक)
- असाेसिएट प्लेअर : रशीद खान (अफगाणिस्तान)
- महिला क्रिकेटर अाॅफ द इयर : एलीस पैरी (अाॅस्ट्रेलिया)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.