आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची आयर्लंडवर ७६ धावांनी मात; रोहित शर्मा आणि शिखर धवनचे शानदार अर्धशतके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्लिन- भारताने आपल्या १०० व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडवर ७६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २०८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात आयर्लंड संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १३२ धावा करू शकला. 


भारतीय टीमच्या दोन सलामीवीरांनी शानदार सुरुवात करून दिली. रोहित शर्मा आणि शिखर धवनने शानदार अर्धशतके झळकावली. रोहित शर्माने ६१ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ५ षटकार खेचत ९७ धावा काढल्या. राेहितचे हे १५ वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले. त्याचे तिसरे टी-२० शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. शिखरने आपले सातवे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावले. त्याने ४५ चेंडूंत ७४ धावा ठोकल्या. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाच चेंडूंत एक चौकार व एक षटकार लगावत ११, सुरेश रैनाने १० आणि हार्दिक पंड्याने नाबाद ६ धावा जोडल्या. कर्णधार विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही. आयर्लंडच्या पीटर चेझने ३५ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. केविन ओब्रायनने एकाला टिपले. 


कुलदीप चमकला 
प्रत्युत्तरात आयर्लंडकडून जेम्स शेनोनने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार खेचत सर्वाधिक ६० धावा केल्या. शेनोन वगळता एकही फलंदाज मैदानावर टिकू शकला नाही. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने २१ धावा देत ४ आणि यजुवेंद्र चहलने ३८ धावा देत ३ गडी बाद केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. 

बातम्या आणखी आहेत...