आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका विजयासह दाैऱ्याचा निकाल अाज हाेणार निश्चित;भारत-द. अाफ्रिका टी-20 सामना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- टीम इंडिया अाता यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सलग मालिका विजयासाठी उत्सुक अाहे. भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील तिसरा अाणि निर्णायक टी-२० सामना शनिवारी केपटाऊनच्या मैदानावर रंगणार अाहे. दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह ही तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बराेबरी साधली अाहे. अाता या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्याचा विराट काेहलीचा मानस अाहे. यासह भारताला वनडेपाठाेपाठ टी-२० मालिका अापल्या नावे करण्याची संधी अाहे. याशिवाय सामन्यातील कामगिरीवर भारतीय संघाच्या अाफ्रिकन दाैऱ्याचाही निकाल लागणार अाहे. भारताने दाैऱ्यातील तीन मालिकांमध्ये १-१ ने बराेबरी साधली अाहे.अाता टी-२० मालिका विजयाने यामध्ये २-१ ने अाघाडीचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.  भारताने ५-१ ने अाफ्रिकेविरुद्धची सहा वनडे सामन्यांची मालिका जिंकली अाहे.   


धाेनीच्या झेलचे हाेईल अर्धशतक: यष्टिरक्षक धाेनीला अाता टी-२० मध्ये झेलचे अर्धशतक साजरे करण्याची संधी अाहे. यासाठी त्याला एका झेलची गरज अाहे.  यातून ५० झेल  घेणारा धाेनी हा पहिला यष्टिरक्षक ठरेल.

 

पावसाचे सावट 
केपटाऊन येथील तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट अाहे. याठिकाणी सकाळी पावसाचे अागमन हाेण्याची शक्यता   वर्तवली अाहे. मात्र, संध्याकाळी वातावरणात बदलही वर्तवला अाहे. सकाळच्या पावसामुळ खेळपट्टीवर परिणाम पडण्याची शक्यता अाहे. त्यामुळे वेगवान गाेलंदाजांना कसरत करावी लागेल.   

 

 

भारताचा कर्णधार विराट काेहली विक्रमाच्या उंबरठ्यावर 
विराट काेहलीला टी-२० मध्ये विक्रमी धावांचा पल्ला गाठण्याची संधी अाहे. १७ धावांची खेळी केल्यास काेहलीच्या नावे टी-२० मध्ये २ हजार धावांची नाेेंद हाेईल. अशी कामगिरी करणारा ताे पहिला भारतीय फलदंाज ठरेल. तसेच जगभरातील तिसरा फलंदाज म्हणून त्याच्या नावाची नाेंद हाेईल. 

 

नंबर वन विराट काेहलीची तिसऱ्या स्थानी घसरण  
विराट काेहलीला  मालिकेतील दाेन सामन्यांतील सुमार खेळीमुळे  टी-२० क्रमवारीत नंबर वन स्थान गमावावे लागले. त्याची  तिसऱ्या स्थानी घसरण झाली. त्याने अनुक्रमे २६ अाणि १ धाव काढली. पाकच्या बाबर अाझमने अव्वल स्थान गाठले. अाॅस्ट्रेलियाच्या  फिंचने दुसरे स्थान गाठले.

बातम्या आणखी आहेत...