आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंडची नजर अाज मालिका विजयावर; रंगणार निर्णायक वनडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीड्स- विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अाता सलग दुसऱ्या मालिका विजयासाठी सज्ज झाला अाहे. भारताची नजर अाता तिसऱ्या वनडेत बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्याकडे लागली अाहे. यासाठी टीम इंडियाला तिसऱ्या अाणि शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात यजमान इंग्लंडच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. दाेन्ही संघ अाता लीड्सवरील तिसऱ्या वनडे सामन्यात समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे  अाता तिसऱ्या वनडेतील विजयाने ही मालिका खिशात घालण्याची दाेन्ही संघांना संधी अाहे. गत सामन्यातील विजयाने इंग्लंडला मालिकेत बराेबरी साधता अाली.   


> गत आठवड्यात भारतीय संघाने दाखल्यात यजमान इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका अापल्या खिशात घातली. त्यानंतर अाता ही लय कायम ठेवताना वनडे मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा मानस अाहे. यासाठी भारतीय संघाने दाेन दिवस कसून सराव केला. याचा निश्चित असा माेठा फायदा पाहुण्या टीमला हाेऊ शकेल.  
> दुसरीकडे विजयासह इंग्लंडचा संघ अाता घरच्या मैदानावरील मालिका पराभव टाळण्यासाठी सज्ज झाला अाहे. यजमानांनीही या सामन्याच्या तयारीसाठी कसून मेहनत घेतली अाहे. त्यामुळे इंग्लंड टीम या मैदानावर सरस खेळी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.


कुलदीप फाॅर्मात
सलग दाेन वनडे सामन्यांत भारताच्या कुलदीप यादवने धारदार गाेलंदाजी केली. यासह त्याने या मालिकेत अापला दबदबा निर्माण केला. त्याने अातापर्यंत दाेन वनडेत एकूण ९ विकेट घेतल्या. यात सलामीच्या ६ अाणि दुसऱ्या वनडेतील तीन बळींचा समावेश अाहे. अाता त्याच्याकडून टीमला तिसऱ्या वनडेत भेदक माऱ्याची अाशा अाहे. यातूनच टीम इंडियाला अापला मालिका विजय निश्चित करता येईल.


संभाव्य संघ...
भारत
: विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल,महेंद्रसिंग धाेनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ काैल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.  


इंग्लंड : माेर्गन (कर्णधार), जेसन राॅय, जाॅनी बैयरस्ट्राे, जाेस बटलर, माेईन अली, ज्याे रुट, जॅक बाॅल, टाॅम, हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टाेक्स, अादिल रशीद, डेव्हिड व्हिल्ली, मार्क वुड

बातम्या आणखी आहेत...