Home | Sports | From The Field | India-England Tast Match From August 1 in Birmingham

१ अाॅगस्टपासून बर्मिंघहॅममध्ये भारत-इंग्लंड कसाेटी रंगणार; विजयाची मदार गाेलंदाजीवर!

वृत्तसंस्था | Update - Jul 27, 2018, 09:32 AM IST

टीम इंडिया अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेला १ अाॅगस्टपासून सुरुवात हाेत अाहे.

 • India-England Tast Match From August 1 in Birmingham

  लंडन- टीम इंडिया अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेला १ अाॅगस्टपासून सुरुवात हाेत अाहे. येत्या बुधवारपासून बर्मिंघहॅमच्या मैदानावर भारत-इंग्लंड सलामी कसाेटी रंगणार अाहे. या मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरणार अाहे. एका मालिका विजयाने भारतीय संघाचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. त्यामुळे अाता दुसऱ्या मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील राहिल. मात्र, यासाठी टीम इंडियाला माेठी कसरत करावी लागणार अाहे.


  या मालिका विजयासाठी भारताला थिंक टॅंकला सर्वाधिक धाेका गाेलंदाजीचा अाहे. याच्या याेग्य प्रकारच्या समन्वयामुळे भारताला ही मालिका अापल्या नावे करता येईल. त्यामुळे टीम इंडियाची पहिली पसंती असलेला भुवनेश्वर कुमार हा या मालिकेतून बाहेर अाहे. याशिवाय जसप्रीत बुमराहदेखील कमीत कमी एक कसाेटीसाठी संघाबाहेर असेल. मात्र, या दाेघांनी अापला सराव कायम ठेवला अाहे.


  या दाेघांशिवाय भारताकडे गाेलंदाजीचे तीन माेठे पर्याय अाहेत. त्यामुळे काेहली याच पर्यांयाच्या अाधारे मालिका विजयाचे मिशन फत्ते करू शकेल. यासाठी त्यालाही याेग्य प्रकारच्या निर्णयाची गरज अाहे. त्यामुळे सामन्याच्या दिवशीच त्याच्या निर्णयावर लक्ष असेल.


  येथे निराशाजनक अाहे भारतीय संघाचे रेकाॅर्ड


  पर्याय १ दाेन वेगवान गाेलंदाज, एक अाॅलराउंडर, दाेन स्पिनर
  खेळपट्टी :
  गवत असेल, मात्र सर्वाधिक ग्रीन नसेल. यंदा इंग्लंडमध्ये सर्वाधिक उन्हाळा हाेता. ग्रीन टाॅप मेंटेन करणे कठीण हाेते. सर्वाधिक शक्यता याच खेळपट्टीची असते.
  हे असतील गाेलंदाज : माे. शमी, ईशांत शर्मा, हार्दिक, अार. अश्विन, कुलदीप यादव.


  पर्याय -२ : तीन वेगवान गाेलंदाज, १ अाॅलराउंडर, १ स्पिनर
  पीच :
  ग्रीन टाॅप असून हवामानात थंडावा असेल. यातूनच हा पर्याय जुळून येण्याची शक्यता अाहे.
  हे असतील गाेलंदाज : माे. शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक, अार. अश्विन.


  पर्याय -३ तीन वेगवान गाेलंदाज, २ स्पिनर
  खेळपट्टी :
  या ठिकाणी अाेलसरपणाचे प्रमाण अधिक राहिल्यास सुरुवातीच्या षटकांसाठी तीन गाेलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा निर्णय हाेऊ शकताे.
  हे असतील गाेलंदाज : माे. शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, अार. अश्विन, कुलदीप यादव.

  या मैदानावरील भारत-इंग्लंडचे रेकाॅर्ड

  > ५० पैकी २७ कसाेटींत यजमान विजयी
  यजमान इंग्लंड संघाचे बर्मिंघहॅमच्या मैदानावरील रेकाॅर्ड लक्षवेधी अाहे. या टीमने १९०२ ते अाजतागायत या मैदानावर ५० कसाेटी खेळल्या. यातील २७ कसाेटींत विजय मिळवला. केवळ ८ कसाेटींत टीमचा पराभव झाला. तर, १५ कसाेटी सामने अनिर्णित राहिले अाहेत.

  > सहापैकी पाच कसाेटींत भारताचा पराभव
  भारतीय संघासाठी हे मैदान अद्याप तरी चांगले ठरलेले नाही. भारताने १९६७ पासून अाजतागायत या ठिकाणी सहा कसाेटी सामने खेळले. यातील ५ कसाेटींत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. एक कसाेटी अनिर्णित राहिली हाेती.

  > मागील तीन कसाेटींपासून यजमान इंग्लंड विजयी
  इंग्लंडने या मैदानावर २०१५ ते अातापर्यंत ३ कसाेटी सामने खेळले. यात इंग्लंडने विजय मिळवला. यात इंग्लंडने पहिल्या कसाेटीत अाॅस्ट्रेलियावर ८ गड्यांनी मात केली. २०१६ मध्ये पाकवर १४१ , २०१७ मध्ये विंडीजवर डाव व २०९ धावांनी मात केली.


  दीड वर्षानंतर अादिल रशीदला कमबॅकची संधी
  भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत अाहे. या मालिकेतील सलामीच्या कसाेटी सामन्यासाठी गुरुवारी १३ सदस्यीय यजमान इंग्लंड संघाची घाेषणा करण्यात अाली. संघात अादिल रशिद अाणि माेईन अलीची निवड करण्यात अाली. अादिल हा तब्बल १९ महिन्यांनंतर इंग्लंड कसाेटी संघाकडून खेळणार अाहे. त्याने अापल्या करिअरमधील शेवटचा कसाेटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये भारताविरुद्ध खेळला हाेता. तसेच टीममध्ये माेईन अली हा दुसऱ्या फिरकीपटूच्या भूमिकेत असेल. रुटच्या नेतृत्वाखाली यजमान टीम या कसाेटीत अापले कसब पणाला लावेल.


  इंग्लंड संघ : ज्याे रुट (कर्णधार), माेईन अली, जेम्स अॅडरसन, जाॅनी बैयरस्ट्राे, स्टुअर्ट ब्राॅड, जाेस बटलर, कुक, सॅम, किटाेन जेनिंग्स, मलान, जेमी पाेर्टर, अादिल रशिद, बेन स्टाेक्स.

Trending