आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका : भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- टीम इंडिया गुरुवारी निदास तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. भारताला पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. आजचा सामना भारतासाठी करा किंवा मरा ठरणार आहे.  जर भारताने आजचा सामना गमावला, तर फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तीनही संघांना प्रत्येकी २ सामने खेळायचे आहेत. अव्वल २ संघ १० मार्च रोजी फायनल खेळेल.  


श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये शिखर धवन वगळता इतर फलंदाज चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. कर्णधार रोहित शर्मादेखील शून्यावर बाद झाला. रोहित फॉर्मात परतला नाही, तर त्याच्यावर होणारी टीका थांबणार नाही. रोहित झटपट बाद झाल्यावर त्याचा परिणाम भारतीय फलंदाजीवर दिसून येतो. संघ मोठी धावसंख्या उभारू शकत नाही. रोहितने म्हटले की, संघ पहिल्या सामन्यातील पराभवातून शिकत बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या सामन्यात चांगले प्रदर्शन करेल. दुसऱ्या सामन्यात लेफ्ट ऑर्म स्पिनर अक्षर पटेलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

 

संभाव्य संघ
भारत -
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वाॅशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, सिराज, ऋषभ पंत.
बांगलादेश - महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, तमीम इक्बाल, सौम्य सरकार, मुशफिकुर रहिम, शबीर रहमान, मुस्तफिजुर रहमान, रूबेल हुसेन, अबू जायेद, तास्किन अहमद, इमरूल कायेस, नुरूल हसन, मेहंदी हसन, अरिफुल हक, नजमुल इस्लाम अबु हिदर रॉनी.

बातम्या आणखी आहेत...