आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजर एेतिहासिक विजयावर!; भारताचे पुरुष व महिला संघ विजयाने रचणार इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेहान्सबर्ग- फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अाता यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध एेतिहासिक मालिका विजय संपादन करण्यासाठी सज्ज झाला अाहे. 

 

जाेहान्सबर्गच्या मैदानावर भारत अाणि अाफ्रिका यांच्यातील चाैथा वनडे सामना रंगणार अाहे.  भारताने सलग तीन विजय संपादन करताना सहा वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने अाघाडी घेतली. अाता चाैथ्या सामन्यात बाजी मारल्यास भारताला मालिका अापल्या नावे करता येईल. या सामन्यात मैदानावर खेळाडू पिंक रंगाच्या ड्रेस घालून उतणार अाहेत. 

 
दुसरीकडे सलगच्या पराभवाने यजमान दक्षिण अाफ्रिकेचा संघ अडचणीत सापडला अाहे. सुमार खेळीमुळे या टीमवर सध्या मालिका पराभवाचे सावट निर्माण झाले अाहे. टीमला अापल्या घरच्या मैदानावरील वनडे मालिकेत अद्याप विजयाचे खाते उघडता अाले नाही.   अाता जाेहान्सबर्गवरील सामना हा यजमानांसाठी निर्णायक अाहे. 


डिव्हिलियर्स परतणार 
यजमान दक्षिण अाफ्रिकेचा अाघाडीचा फलंदाज डिव्हिलियर्स अाता मैदानावर पतरणार अाहे. त्याने चाैथ्या वनडेत खेळण्याचे संकेत दिले. त्यामुळे या सामन्यातून मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तिसऱ्या कसाेटीतील दुखापतीमुळे त्याला मालिकेतील तीन वनडे सामन्यात खेळता अाले नाही.

 

काेहलीवर मदार 
भारताच्या मालिका विजयाची मदार अाता कर्णधार विराट काेहलीवर असेल. त्याने सलगच्या झंझावाती शतकाची  लय कायम ठेवताना भारताला विजय मिळवून दिले. त्यामुळे टीमला त्याच्याकडून या मैदानावरील माेठ्या खेळीची अाशा अाहे. काेहलीही तुफानी खेळीसाठी उत्सुक अाहे. त्याने गत सामन्यात नाबाद १६० धावा काढल्या.

 

भारतीय महिलांकडून अाज अाफ्रिकेला व्हाइटवाॅश!

 मालिका विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय महिला संघ अाता शनिवारी यजमान दक्षिण अाफ्रिका टीमला व्हाइटवाॅश देण्यासाठी सज्ज  झाला अाहे. हे दाेन्ही संघ शेवटच्या तिसऱ्या वनडेत समाेरासमाेर असतील. सलगच्या दाेन विजयाच्या बळावर भारतीय महिलांनी तीन वनडेच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली.  अाफ्रिकेचा धुव्वा उडवण्याचा भारताचा मानस अाहे. 

बातम्या आणखी आहेत...