Home | Sports | From The Field | India vs England Test Series

कसाेटी मालिका : टीम इंडिया गत ९ वर्षांपासून विदेशात सलामीला अपयशी

वृत्तसंस्था | Update - Jul 31, 2018, 09:15 AM IST

भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे.

 • India vs England Test Series
  इंग्लंड सलामीच्या कसाेटी सामन्यांच्या तयारीसाठी सराव करताना टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली.

  बर्मिंगहॅम- भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. मालिकेतील सलामीचा सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर रंगणार अाहे. या कसाेटीसाठी भारतीय संघाने कंबर कसली अाहे. त्यामुळे शानदार विजयी सलामीने मालिका अापल्या नावे करण्याच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे. त्यामुळे या सलामीला सर्वाेत्तम कामगिरी करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष लागले अाहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करत अाहे. त्यामुळे कर्णधार काेहलीच्या नेतृत्वात मालिका विजयाची माेहीम फत्ते करण्यासाठी युवा खेळाडू उत्सुक अाहेत.


  विदेश दाैऱ्यात भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. यातूनच या टीमला २००९ पासून अाजपर्यंत ही पराभवाची मालिका खंडित करता अालेली नाही. त्यामुळे अाता इंग्लंड दाैऱ्याच्या निमित्ताने भारताला ही माेठी संधी अाहे. भारताने अातापर्यंत अाफ्रिकेविरुद्ध तीन, अाॅस्ट्रेलिया अाणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी दाेन, न्यूझीलंडविरुद्ध एक कसाेटी मालिका खेळली. मात्र, यात टीमला पराभवाचा सामना करावा लागला.


  इंग्लंडची १ हजारावी कसाेटी
  यजमान इंग्लंडचा संघ अाता बुधवारी अापल्या करिअरमधील १ हजारावी कसाेटी खेळण्यासाठी मैदानावर उतणार अाहे. अशा प्रकारे एक हजार कसाेटी खेळणारा इंग्लंड हा पहिला संघ अाहे. त्यापाठाेपाठ ८१२ कसाेटीसह अाॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर अाहे.


  टीम इंडियाची कामगिरी अपयशी
  अाशिया खंडाबाहेर भारतीय संघाला समाधानकारक अशी कामगिरी अातापर्यंत करता अालेली नाही. या दाैऱ्यादरम्यान भारतीय संघाचे रेकाॅर्ड अधिक गचाळ राहिलेे. मागील ९ वर्षांत भारताला झिम्बाव्वे, विंडीज अाणि अाशियाबाहेर झालेल्या कसाेटी मालिकेच्या सलामीला विजय मिळवता अालेला नाही. भारताचा २००९ पासून अाजतागायत अाॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड अाणि अाफ्रिकेत काेणत्याही कसाेटी मालिकेच्या सलामीला पराभव झाला अाहे.


  राग व्यक्त करून काेहलीला चॅलेंज करा
  या कसाेटी मालिकेपूर्वीच सध्या शाब्दिक सामन्यांना सुरुवात झाली अाहे. यादरम्यान वादाला ताेंड फुटावे म्हणून यातूनच दाेन दिवसांपूर्वी जाेस बटलरने गरळ अाेकली. अायपीएलदरम्यानची मैत्री ही अाता या माालिकेत उपयाेगी ठरणारी नाही. तसेच माजी कर्णधार मायकेल वाॅनने खेळाडूंना राग व्यक्त करून काेहलीला चॅलेंज देण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारच्या शाब्दिक वादातून हे सर्व जण काेहलीला उचकवण्याचा प्रयत्न करत अाहेत.

Trending