Home | Sports | From The Field | India vs Pakistan cricket clash in Asia Cup on 19th September

Ind vs Pak : आशिया कपमध्ये 19 सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 25, 2018, 06:02 PM IST

आशिया कप स्पर्धेत 19 सप्टेंबरला क्रिकेटमधील हे दोन कट्टर विरोधक देश एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील.

  • India vs Pakistan cricket clash in Asia Cup on 19th September

    स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या क्रिकेट हंगामात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेत 19 सप्टेंबरला क्रिकेटमधील हे दोन कट्टर विरोधक देश एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.


    या सामन्यात 2006 नंतर प्रथमच हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या विरोधात यूएईमध्ये मॅच खेळणार आहेत. यापूर्वी या दोन संघांनी शारजाहमध्ये 24 आणि अबू धाबीमध्ये दोन सामने खेळले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्या वर्षभरापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना झाला होता. त्यावेळी पाकिस्तानने भारताचा पराभव करत मालिकेत विजय मिळवला होता. पाकिस्तानविरोधातील मॅचपूर्वी भारताचा संघ 18 सप्टेंबरला दुबईतच क्वालिफायर टीमबरोबर सामना खेळेल.


    भारत पाकिस्तानसह सहा संघ या मालिकेत सहभागी होत आहेत. या संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. त्यापैकी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या गटातील तिसऱ्या संघाची घोषणा 29 ऑगस्ट ते सहा सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेनंतर केली जाईल. सिंगापूर, हाँगकांग मलेशिया, नेपाळ, यूएई यांच्यातून हे संघ निवडले जातील.

Trending